'बाहुबली-द कनक्लूजन' पहिल्याच दिवशी १०० कोटींचा गल्ला जमवणार?

2015साली आलेल्या बाहुबली या सिनेमानं तब्बल 650कोटींचा व्सवसाय केला होता. आता 'बाहुबली द कन्क्लूजन' हा सिनेमा हे सगळेच रेकॉर्ड्स मोडणार असल्याची चर्चा रंगतेय. 

Updated: Apr 27, 2017, 04:08 PM IST
'बाहुबली-द कनक्लूजन' पहिल्याच दिवशी १०० कोटींचा गल्ला जमवणार? title=

मुंबई : 2015साली आलेल्या बाहुबली या सिनेमानं तब्बल 650कोटींचा व्सवसाय केला होता. आता 'बाहुबली द कन्क्लूजन' हा सिनेमा हे सगळेच रेकॉर्ड्स मोडणार असल्याची चर्चा रंगतेय. 

'बाहुबली द कन्क्लूजन' हा सिनेमा भारतात जवळपास 9000 स्क्रीन्समध्ये प्रदर्शित होणार आहे, केवळ भारतातच नव्हे तर जगभरात हा सिनेमा उद्या झळकणार आहे.

याच बरोबर 'बाहुबली द कन्क्लूजन' या सिनेमाचे तिकीट दर ही गगनाला भिडतायेत. सिनेमाचं डिस्ट्रीब्यूशनही तगडं आहे. सिनेमाचं अॅडव्हान्स बुकींगही सुरु झालं असून साऊथमध्ये तर 2 मे पर्यंतचे शो हाऊसफुल झाले आहेत..आता पर्यंत तब्बल 55 टक्के या सिनेमाचं अॅडव्हान्स बुकींग झालं आहे..त्यामुळे साहजिकचं बाहुबलीच्या दुस-या भागाकडून सगळ्यांची उत्सुकता वाढली आहे..