हाय हिल न घातल्याने तिने गमावली नोकरी

हाय हिल घालायला नकार दिला म्हणून एका महिलेला तिच्या नोकरीच्या पहिल्याच दिवशी काढून टाकण्यात आलंय. 

Updated: May 13, 2016, 03:37 PM IST
हाय हिल न घातल्याने तिने गमावली नोकरी title=

लंडन : हाय हिल घालायला नकार दिला म्हणून एका महिलेला तिच्या नोकरीच्या पहिल्याच दिवशी काढून टाकण्यात आलंय. 

27 वर्षांची निकोला थॉर्प ही एका फायनान्स कंपनीत रिसेप्शनिस्ट म्हणून रुजू झाली होती. तिला दोन ते चार इंचांच्या हायहिल्स घालायला सांगण्यात आलं. पण तिनं दिवसभर हाय हिल्स घालून काम करायला नकार दिला. 

पुरुषांना अशी बंधनं का नाहीत, असा सवालही तिनं कंपनीला केला पण त्याचं कुठलंही उत्तर न देता तिला सरळ काढून टाकण्यात आलं. आता निकोलानं याविरोधात कॅम्पेन सुरू केलंय. तसंच एक याचिकाही कोर्टात दाखल केलीय. 

याप्रकरणी संबंधित कंपनीला विचारणा केली असता, आमच्या कंपनीत ड्रेसकोडबद्दल गाईडलाईन्स आहेत. त्या सगळ्यांना पाळाव्याच लागतात, असं स्पष्टीकरण देण्यात आलंय.