मुंबई : नरेंद्र मोदी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा खरपूस समाचार सोशल मीडियावर घेतला जातोय, नरेंद्र मोदी म्हणाले होते, "शांघायमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर बोलताना यापूर्वी तुम्हाला भारतात जन्मल्याबद्दल लाज वाटायची, मागील वर्षी भारतात नवे सरकार येण्याची इच्छा परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी बाळगली होती. आता तुम्हाला भारताचे प्रतिनिधित्व करताना अभिमान वाटत असेल", असे विधान केले होते.
विशेष म्हणजे पंतप्रधानांनी अशाच आशयाची विधाने दक्षिण कोरियामध्ये सेऊल येथे बोलतानाही केली. त्यामुळेच त्यांच्या या विधानावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्व आशियाच्या दौऱ्यामध्ये केलेल्या भाषणांमध्ये भारतीयांचा अपमान केला, अशा आशयाची विधाने करीत टिष्ट्वटरवर त्यांच्याविरोधात प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.
चीन आणि कोरियामध्ये भाषण करताना आपण पंतप्रधान होण्यापूर्वी नागरिकांना भारतीय असण्याची शरम वाटायची, असे विधान केले होते. याच विधानाचा टिष्ट्वटरवर समाचार घेतला जात आहे.
सततच्या परदेश दौऱ्यांमुळे चर्चेत येणारे पंतप्रधान त्यांच्या तेथील भाषणांमुळेही चर्चेत आणि वादाच्या गर्तेत सापडत आहेत. मॉरिशस असो वा अमेरिका, पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथील भारतीयांना भेटतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.