नॅशनल हॅराल्ड प्रकरण : सोनिया, राहुल गांधींना दिलासा

 नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दिलासा मिळालाय. या प्रकरणाची सुनावणी १९ डिसेंबरला होणार असल्याचे त्यांना तात्पुरता दिलासा मिळालाय. 

Updated: Dec 8, 2015, 11:19 AM IST
नॅशनल हॅराल्ड प्रकरण : सोनिया, राहुल गांधींना दिलासा title=

नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दिलासा मिळालाय. या प्रकरणाची सुनावणी १९ डिसेंबरला होणार असल्याचे त्यांना तात्पुरता दिलासा मिळालाय. 

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात जारी करण्यात आलेले समन्स बरखास्त करण्याची राहुल-सोनिया यांची याचिका सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळून लावली होती. त्यामुळे सोनिया आणि राहुल यांना आज कोर्टात हजर रहाव लागणार होतं.

दरम्यान, या निर्णयाला आव्हान देत सोनिया आणि राहुल यांनी मंगळवारी पटियाला हाऊस कोर्टात नवा अर्ज सादर केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १९ डिसेंबरला होणार असल्याने राहुल आणि सोनिया यांना तात्पुरता दिलासा मिळालाय. 

न्यायमूर्ती सुनील गौड यांनी खालच्या कोर्टात या प्रकरणात व्यक्तिगत रुपात उपस्थित राहण्यात सूट देण्याविषयी केलेली याचिकाही फेटाळलीय. खालच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. 

 

या प्रकरणात, राहुल आणि सोनिया यांच्याशिवाय आरोपी म्हणून सुमन दुबे, मोतीलाल वोहरा, ऑस्कर फर्नांडीस, सॅम पित्रोदा आणि यंग इंडिया लिमिटेड यांची नावं आहेत. 

काय आहे हे प्रकरण... 
देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी सन १९३८ मध्ये ‘नॅशनल हेरॉल्ड’ हे वृत्तपत्र सुरू केले. ते सन २००८ मध्ये बंद पडले. त्यानंतर सन २०१० मध्ये ‘यंग इंडिया’ या नव्याने स्थापन झालेल्या कंपनीने हे वृत्तपत्र विकत घेतले. या व्यवहारासाठी काँग्रेसने तब्बल ९० कोटी रुपये कर्जाऊ दिले होते. 

काँग्रेसकडून कर्ज घेऊन हे वृत्तपत्र ताब्यात घेण्याचा व्यवहार हा या वृत्तपत्राच्या मालमता ताब्यात घेण्यासाठी करण्यात आला असून तो बेकायदेशीर आहे; असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.