'आईचं दूध प्यायलं असेल तर आरएसएसवर बंदी आणून दाखवा'

उत्तरप्रदेशातील भाजप अध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी यांनी समाजवादी पार्टीचे नेते आणि अखिलेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री आझम खान यांच्यावर निशाणा साधलाय. पण, याच वेळी त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाजपेयीच अडचणीत आलेत. 

Updated: Dec 8, 2015, 09:25 AM IST
'आईचं दूध प्यायलं असेल तर आरएसएसवर बंदी आणून दाखवा' title=

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील भाजप अध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी यांनी समाजवादी पार्टीचे नेते आणि अखिलेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री आझम खान यांच्यावर निशाणा साधलाय. पण, याच वेळी त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाजपेयीच अडचणीत आलेत. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पाठराखण करताना 'आझम खान यांनी आईचं दूध प्यायलं असेल तर त्यांनी आरएसएसवर बंदी आणून दाखवावी' असं वादग्रस्त वक्तव्य भाजपच्या या नेत्यानं केलंय. 

'उत्तरप्रदेशात त्यांचं सरकार आहे आणि आझम खान पक्षात दुसऱ्या नंबरच्या पदावर आहेत. त्यांनी बंदी तर आणून दाखवावी... मग त्यांनी त्याचे परिणाम काय होतील हेदेखील कळेल' असं आव्हान वाजपेयी यांनी अखिलेश सरकारलाही दिलंय. 

याशिवाय, मुस्लिम राजनीतीमध्ये आता पायाखालची वाळू सरकलीय. अशा वेळी सतत चर्चेत राहण्यासाठी आझम वादग्रस्त वक्तव्य करत आहेत, असं देखील वाजपेयी यांनी म्हटलंय. सोबतच, अयोध्येत राम मंदिरचं निर्माण होणारच, असा दावाही त्यांनी केलाय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.