उन्नावच्या सोनेरी गावात पर्यटन विकसित करणार यूपी सरकार

उन्नावचं डौडियाखेडा गाव... आठवलं का... हो तेच गाव जिथं खजिन्याचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची झोपच उडाली होती. जवळपास एका महिन्याच्या मेहनतीनंतरही पुरातत्व विभागाला तिथं सोनं सापडलं नाही. मात्र आता उत्तर प्रदेश सरकार डौडियाखेडाच्या निमित्तानं खजिना जमवण्याच्या मागे लागलंय. कारण यूपी सरकार डौडियाखेडाला पर्यटन स्थळ बनवणार आहे. 

Updated: Jul 28, 2014, 08:41 AM IST
उन्नावच्या सोनेरी गावात पर्यटन विकसित करणार यूपी सरकार title=

डौडियाखेडा/उत्तर प्रदेश: उन्नावचं डौडियाखेडा गाव... आठवलं का... हो तेच गाव जिथं खजिन्याचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची झोपच उडाली होती. जवळपास एका महिन्याच्या मेहनतीनंतरही पुरातत्व विभागाला तिथं सोनं सापडलं नाही. मात्र आता उत्तर प्रदेश सरकार डौडियाखेडाच्या निमित्तानं खजिना जमवण्याच्या मागे लागलंय. कारण यूपी सरकार डौडियाखेडाला पर्यटन स्थळ बनवणार आहे.  

उन्नावचं डौडियाखेडा गाव कालपर्यंत आपल्या जवळपास असलेल्या इतर गावांसारखं एक सामान्य गाव होतं. मात्र खजिन्याच्या शोधात एका रात्रीत हे गाव देशाच्या पटलावर आलं. अखिलेश यादव सरकारनं गावाच्या याच प्रतिमेद्वारे पैसे जमवण्याची तयारी चालवलीय. सरकारला अपेक्षा आहे की, इथं पर्यटन स्थळ विकसित केल्यानं इथं मोठ्या संख्येनं पर्यटक येतील. 

डौडियाखेडा 2013 वर्षातील एक महत्त्वाची चर्चात्मक बातमी ठरली. एका बाबानं आपल्या स्वप्नात राजा राव बख्श सिंहच्या किल्ल्यात जमिनीखाली सोनं असल्याचं पाहिलं. बाबा शोभन सरकारच्या या स्वप्नावर मनमोहन सिंह सरकारनंही विश्वास ठेवला आणि पोलीस, पुरातत्त्व विभागासह एक हजार टन सोन्याचा शोध घेणं सुरू केलं. जवळपास एक महिना सोन्याचा शोध सुरू होता. मात्र त्यांच्या हाती काही लागलं नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.