माजी मंत्री, खासदारांना लवकरच बंगले सोडावे लागणार

माजी मंत्र्यांना आणि माजी खासदारांना आता दिल्लीतील बंगले लवकरच सोडावे लागणार आहेत.

Updated: Jul 27, 2014, 10:29 PM IST
माजी मंत्री, खासदारांना लवकरच बंगले सोडावे लागणार title=

नवी दिल्ली : माजी मंत्र्यांना आणि माजी खासदारांना आता दिल्लीतील बंगले लवकरच सोडावे लागणार आहेत.

लोकसभा निवडणुका होऊन दोन महिने उलटल्यानंतरही सरकारी बंगले सोडलेले नाहीत, अशा माजी मंत्री आणि माजी खासदारांविरुद्ध कारवाईची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली आहे.

ज्या बंगले आणि फ्लॅट अद्याप सोडलेले नाहीत अशा जवळपास वीस माजी मंत्र्यांना आणि १२० माजी खासदारांना नोटिसा पाठविण्यात येत आहेत. 

केंद्रीय ग्रामविकास मंत्री वैंकय्या नायडू यांनी यासंदर्भात कारवाई करण्याच्या प्रस्तावाला मागील शुक्रवारी मंजुरी दिल्यानंतर ही पाउले उचलण्यास सुरवात झाली आहे. 

नोटिसा बजावण्यात आल्यानंतर एका आठवड्याच्या आत निवासस्थान सोडले नाही तर कारवाई करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

एनडीए सरकार स्थापन करण्यात आल्यानंतर कायद्यानुसार सरकारने माजी मंत्री व खासदारांना २६ जूनपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर काही मंत्री आणि खासदारांच्या मागणीनुसार ही मुदत २६ जुलैपर्यंत वाढविण्यात आली होती. 

मात्र, यापुढे कोणतीही मुदतवाढ देण्यास वैंकय्या नायडू यांनी नकार दिला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.