शुद्ध सोने आणि त्याची गुणवत्ता तपासण्याचे तीन सोपे मार्ग

भारतीय परंपरामध्ये सोने खरेदीला खूप महत्व दिले गेले आहे. दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी केले जाता. अक्षयतृत्तीयाच्या मुहूर्तावरही सोने खरेदी केले जाते. सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र, सोन्याची शुद्धता आणि गुणवत्ता पाहायची कशी, असा प्रत्येकाला प्रश्न पडतो. मात्र, खालील टिप्स वाचल्यानंतर तुमच्या मनातील प्रश्न निकाली निघेल.

Updated: Nov 5, 2015, 04:08 PM IST
शुद्ध सोने आणि त्याची गुणवत्ता तपासण्याचे तीन सोपे मार्ग title=

मुंबई : भारतीय परंपरामध्ये सोने खरेदीला खूप महत्व दिले गेले आहे. दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी केले जाता. अक्षयतृत्तीयाच्या मुहूर्तावरही सोने खरेदी केले जाते. सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र, सोन्याची शुद्धता आणि गुणवत्ता पाहायची कशी, असा प्रत्येकाला प्रश्न पडतो. मात्र, खालील टिप्स वाचल्यानंतर तुमच्या मनातील प्रश्न निकाली निघेल.

हॉलमार्क
सोने खरेदी करताना पहिल्यांना सावध असले पाहिजे. तसेच सोने खरेदी करताना प्रथम बीआयएस हॉलमार्क पाहिला पाहिजे. हॉलमार्कद्वारे खरे सोने ओळखण्यास पटकन मदत होते. खऱ्या हॉलमार्कवर भारतीय मानक ब्युरोचा तिकोना निशानी असते. आणि त्याच्यावर हॉलमार्किंग सेंटरच्या लोगासह सोनेची शुद्धता लिहिलेली असते.

अॅसिड टेस्ट
तुम्ही सोने खरे आहे की नाही, याची माहिती जाणून घेण्यासाठी अॅसिड टेस्टच्या माध्यमातून सहज शक्य होते. तुम्ही एखाद्या पिनच्या सहाय्याने सोन्यावर ओरखडा ओढा. त्यानंतर नायट्रिक अॅसिडचा एक थेंब टाका. बनावट सोने तात्काळ हिरवे होईल. मात्र, शुद्ध सोन्यावर काहीही परिणाम होणार नाही.

चुंबकाची मदत घ्या
शुद्ध सोने पाहण्यासाठी चुंबकही महत्वाचे काम बजावते. शुद्ध सोने चुंबकाला चिकटत नाही. मात्र, जरा तरी सोने चुंबकाकडे आकर्षित झाले तर काहीतरी गडबड आहे, असे समजा. सोन्यात भेसळ झाल्याचे ते एक लक्षण आहे. त्यामुळे शुद्ध सोने तात्काल समजते. सोने खरेदी करताना सोबत चुंबक घेऊन जावे.

वॉटर टेस्ट
पाण्याच्या माध्यमातून शुद्ध सोनेबाबत खात्री करु शकता. शुद्ध सोने पाहण्यासाठी एका कपमध्ये पाणी घ्या. त्यात सोने बुडवा. जर सोने कपाच्या तळाशी राहिले तर ते सोने अस्सली आहे. सोने तरंग असेल तर ते नकली आहे, हे सममजा. सोने कधीही तरंग नाही ते पाण्यात बुडते तसेच कधीही जंग पकडत नाही.

काय आहे कॅरेटचा फंडा?
सोने किंमत ही कॅरेटवर ठरवली जाते. कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने महाग होते. आपण सोने २४ कॅरेट आणि ज्वलेरी २२ कॅरेटची खरेदी करतो. ज्याची किंमत खूप कमी असते. जर आपल्याला २२ कॅरेट सोन्याची किमत काढायची असेल तर २४ कॅरेट सोने दराला २४ ने भागा आणि २२ने गुणाकार करा. आपल्याला २२ कॅरेट सोनेची किंमत समजेल. २४ कॅरेट सोने ९९.९ टक्के शुद्ध असते. मात्र, २४ कॅरेटचा दागिना होत नाही. कारण २४ कॅरेटचे सोने एकदम मऊ असते. जास्त करुन २२ कॅरेटचे सोन्याचे चलन आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.