दिवाळीपूर्वी पंतप्रधानांकडून 'धनत्रयोदशी'चं गिफ्ट, सोन्याच्या ३ योजना लॉन्च

यंदा धनत्रयोदशी किंवा पाडव्याला सोनं खरेदीचा नवा पर्याय सरकारनं उपलब्ध करून दिलाय. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरकारी गोल्ड बॉन्ड्स अर्थात सोन्याचे कर्जरोखे बाजारात जारी केलेत. या कर्जरोख्यांच्या माध्यमातून एक ग्रॅमच्या पटीत सोनं पेपर स्वरुपात सोनं खरेदी करता येणार आहेत.

Updated: Nov 5, 2015, 04:15 PM IST
दिवाळीपूर्वी पंतप्रधानांकडून 'धनत्रयोदशी'चं गिफ्ट, सोन्याच्या ३ योजना लॉन्च title=

नवी दिल्ली: यंदा धनत्रयोदशी किंवा पाडव्याला सोनं खरेदीचा नवा पर्याय सरकारनं उपलब्ध करून दिलाय. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरकारी गोल्ड बॉन्ड्स अर्थात सोन्याचे कर्जरोखे बाजारात जारी केलेत. या कर्जरोख्यांच्या माध्यमातून एक ग्रॅमच्या पटीत सोनं पेपर स्वरुपात सोनं खरेदी करता येणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धनत्रयोदशीपूर्वी सोन्याच्या तीन योजना लॉन्च केल्या आहेत. यावेळी अशोक चक्र असलेले भारतीय नाण्यांशिवाय गोल्ड मॉनेटायझेशन आणि गोल्ड बाँड स्कीम लॉन्च केल्या. या स्कीम अंतर्गत ५ आणि १० ग्रामचे सोन्याचे शिक्के आणि २० ग्रामचं सोन्याचं बिस्किट पण असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भौतिक रुपात सोन्याची मागणी करमी करण्यासाठी आणि देशात निरुपयोगी पडलेलं २० हजार टन सोन्याचा वापर करण्यासाठी या तीन योजना सुरू केल्या आहेत. पंतप्रधानांनी पहिल्यांदा असं नाणं आणि बुलियन बाजारात आणलं ज्याच्यावर भारताचं राष्ट्रचिन्ह अशोक चक्र आणि महात्मा गांधींचा फोटो आहे. यावेळी पंतप्रधान म्हणाले, देशात २० हाजर टन सोनं बेकार पडलेलं आहे, सोनं महिला सशक्तीकरणाचा महत्त्वपूर्ण भाग आहे.

एमएसटीसी स्टोरद्वारे ५ ग्रामचे १५ हजार, १० ग्रामचे २० हजार आणि २० ग्रामची नाणी ३७५० वेळा विकले जातील. गोल्ड मॉनिटायझेन स्कीम अंतर्गत भारतीय नागरिकांना गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. या योजनेअंतर्गत ३० ग्रामहून अधिक सोनं जमा केलं जावू शकतं. जमा केलेल्या सोन्यावर अडीच टक्क्यांनी व्याज मिळेल. या स्कीममुळे घरात आणि बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्यावर व्याजाच्या रुपात चांगली कमाई होऊ शकेल.

या योजनेत ९९५ शुद्धता असलेलं कमीतकमी ३० ग्राम सोन्याएवढे सोन्याचा तुकडा, नाणं किंवा दागिणे जमा केलं जावू शतं. स्वर्ण बाँड योजनेअंतर्गत गुंतवणुकदारांना दोन ग्राम सोन्यापासून अधिकाधिक ५०० ग्राम सोन्यापर्यंत बाँड विकत घेण्याचा पर्याय असेल. बाँडचा काळ आठ वर्ष असेल आणि पाचव्या वर्षी बाहेर निघण्याचा पर्याय आपल्याला मिळेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.