लिंबूपाण्याचे अधिक सेवन शरीरासाठी ठरु शकते घातक

सकाळी उठून लिंबूपाणी घेणे शरीरासाठी चांगले असते. मात्र तु्म्हाला हे माहीत आहे का की अधिक प्रमाणात लिंबूपाणी शरीरासाठी हानिकारक ठरु शकते. लिंबूपाण्यामुळे शरीराल व्हिटॅमीन सी, पोटॅशियम आणि फायबर्स मिळतात. मात्र याचे अधिक सेवन हानिकार ठरू शकते.

Updated: Dec 28, 2015, 10:35 AM IST
लिंबूपाण्याचे अधिक सेवन शरीरासाठी ठरु शकते घातक title=

नवी दिल्ली : सकाळी उठून लिंबूपाणी घेणे शरीरासाठी चांगले असते. मात्र तु्म्हाला हे माहीत आहे का की अधिक प्रमाणात लिंबूपाणी शरीरासाठी हानिकारक ठरु शकते. लिंबूपाण्यामुळे शरीराल व्हिटॅमीन सी, पोटॅशियम आणि फायबर्स मिळतात. मात्र याचे अधिक सेवन हानिकार ठरू शकते.

लिंबूपाण्याच्या अधिक सेवनामुळे हे नुकसान होऊ शकते

लिंबूपाण्याचे अधिक सेवन केल्यास दात अधिक संवेदनशील होतात. दातांच्या बाहेरील आवरणावर याचा परिणाम होतो. यामुळे गरम आणि थंड खाल्ल्याने दातांमध्ये झिणझिण्या येतात. 

लिंबूपाण्याच्या अधिक सेवनामुळे अॅसिडिटीची समस्याही उद्भवू शकते. पाचन क्रियेवर त्याचा परिणाम होतो. 

लिंबूमध्ये सायट्रिक अॅसिडसोबतच ऑक्सलेटचे प्रमाणही अधिक असते. लिंबूपाणी अधिक प्यायल्याने ते शरीरात क्रिस्टलच्यारुपात जमा होते. यामुळे किडनी स्टोन होण्याची भिती असते.

लिंबू पाणी प्यायल्याने वारंवार लघवीस जावे लागते. यामुळे शरीरात डिहायड्रेशन होण्याची भिती वाढते.

लिंबूपाण्याचे अधिक सेवन हाडांच्या कमकुवतपणासाठीही कारणीभूत ठरु शकते. 

त्यामुळे या समस्या टाळायच्या असल्यास लिंबूपाण्याचे सेवन करा मात्र ते नियंत्रित स्वरुपात.