मुंबई : आज अनेक महिलामध्ये काही अशा गोष्टी आढळून येतात ज्यामुळे त्या गर्भवती होण्यापासून वंचित रहातात. त्यामधला एक प्रमुख घटक आहार ही असतो. योग्य आहार घेतल्याने महिला गर्भवती राहण्यासाठी मदत होते.
गर्भवती होण्यासाठी घ्या हा आहार :
भाज्या : पाले भाज्या हे उत्कृष्ट आहार आहे. ज्यामुळे स्त्रियांमध्ये प्रजनन क्षमता वाढते.
बटाटे : आहारात बेक्ड बटाटा वापरा. व्हिटॅमिन बी मुळे निरोगी अंडी उत्पादनाची शक्यता वाढते.
फळं : आंबट फळं, डाळिंब, केळी, आणि अननस हे आपल्या आहारात नक्की सामील करा. डाळिंबामुळे कामवासना वाढते तर केळीने गर्भधारणा संबंधित तक्रारी दूर होतात. याने मासिक पाळी नियमित होते. आंबट फळांमध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी मुळे अंडाशयातून अंडी मिळवण्यात मदत होते. तसेच अननसामध्ये मँगनीज असल्याने वंध्यत्वाची समस्या दूर होते.
अंडी : प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी अंडी उत्कृष्ट खाद्य पदार्थ आहे. यात कॉलिन, फॉलिक, ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आणि व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असतात.
शेल मासे : मासोळी खायला आवडत असेल तर सैल्मन आणि शेल मासे सर्वोत्तम आहे.
हळद : कमी लोकांनाच माहीत असेल की अँटीऑक्सीडेंट हळदीमध्ये प्रजनन क्षमता वाढण्याचे गुणधर्म आहेत.
मिरची : आपल्या आहारात मिरची सामील करा. ही प्रजनन तंत्राला शुद्ध रक्त पोहवण्यात मदत करते.
लसूण : लसणामध्ये आढळणारे सेलेनियम खनिजामुळे गर्भपात होण्याची शक्यता कमी होते.
भोपळ्याचा बिया : यात झिंक असल्याने या बिया भ्रूण अवस्थेत कोशिका विभाजित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
बदाम : गर्भधारण करण्यासाठी तसे तर सर्व सुकेमेवे खावे चांगले असते. बदाम खाणे पण सर्वोत्तम आहे.