`मिल्खा`ची दौड १०० कोटींच्या पुढे

शंभर कोटींच्या यादीत आता `भाग मिल्खा भाग` सिनेमानेही स्थान पटकावलंय.. राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित आणि फरहान अख्तरची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाने बॉक्सऑफिसवर तब्बल 103 कोटींचा गल्ला कमावलाय..

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 6, 2013, 11:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शंभर कोटींच्या यादीत आता `भाग मिल्खा भाग` सिनेमानेही स्थान पटकावलंय.. राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित आणि फरहान अख्तरची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाने बॉक्सऑफिसवर तब्बल 103 कोटींचा गल्ला कमावलाय..
शंभर कोटीं क्लबमध्ये एन्ट्री म्हणजे हीट सिनेमा.. हे बॉलिवूडचं समीकरण.. आणि आता या क्लबमध्ये भाग मिल्खा भागनेही स्थान पटकावलंय.. 2013 मध्ये पहिल्याचं आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा हा तिसरा सिनेमा ठरलाय.. याआधी ‘ये जवानी है दिवानी’ सिनेमाने तब्बल 189 कोटींची कमाई केलीय. खरं म्हणजे 100 कोटींचा क्लब हा सिलसिला सुरु झाला तो आमीरच्या ‘गजनी’ सिनेमापासून.. 2008 साली आलेल्या गजनीने 115 कोटींची बॉक्सऑफिसवर कमाई केली. तर आमीरच्याच ‘थ्री इडियट्सने’ 202 कोटी.. रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि अजय देवगण स्टारर ‘गोलमाल’ने 108 कोटींचा गल्ला कमावला.. त्यानंतर आलेल्या सलमानच्या ‘दबंग’नेही बॉक्सऑफिसवर बोलबाला केला आणि 142 कोटींचा गल्ला कमावत धडाक्यात शंभर कोटीच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली.. 2011 साली तर बॉलिवूडच्या तब्बल 6 सिनेमांनी शंभर कोटींचा पल्ला पार केलाय..
रा-वन 115 कोटी
बोल बच्चन 100 कोटी
सिंघम 101 कोटी
डॉन 2 - 114 कोटी
रेडी - 124 कोटी
बॉडीगार्ड - 148 कोटी

त्यानंतर 2012 मध्य़ेही बॉलिवूडच्या तब्बल 8 सिनेमांनी शंभर कोटींच्या क्लबमध्ये धडाक्यात एन्ट्री घेतली..
अग्निपथ - 122 कोटी
बर्फी - 122 कोटी
हाऊसफुल - 112 कोटी
सन ऑफ सरदार - 108 कोटी
दबंग 2 - 150 कोटी
रावडी राठोड - 135 कोटी
एक था टायगर - 199 कोटी
जब तक हा जान - 122 कोटी
2013 चे सहा महिने उलटून गेलेत.. आणि या सहा महिन्यांमध्ये 2 दोन सिनेमांनीच शंभर कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतलीय.. मात्र, अजूनही पिक्चर बाकी है.. तेव्हा सुसाट निघालेली भाग मिल्खा भागची ही गाडी आणखी नवीन विक्रम घडवेल अशीच आशा करुया..

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.