www.24taas.com, अहमदाबाद
अक्षय्य तृतीयेला शहरांमध्ये ज्वेलर्सनं खरेदीवर अनेक ऑफर्स आणल्या आहेत. सोने, चांदी तसंच हिऱ्याच्या दागिन्यांच्या खेरेदीवर सूट मिळू शकते. त्याला ग्राहकांचा प्रतिसाद मिळेल अशी सराफांना अपेक्षा आहे. सोनेखरेदीसाठी अक्षय तृतीयेचं महत्त्व आहे. त्यामुळं छोटे-मोठे दुकानदार ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणत आहेत.
मुंबईत त्रिभुवनदास भिमजी झवेरी गोल्ड अँड डायमंडनं दागिन्यांच्या करणावळीवर पन्नास टक्के सूट दिली आहे. तनिष्क ज्वेलरीनं दोन लाख रुपयांपर्यंत सोने खरेदीवर १० टक्के डिस्काऊंट ठेवला आहे. पॉप्ली अँड सन्सनं २० ग्रॅम सोन्याच्या खरेदीवर १ ग्रॅम सोन्याचं नाणं मोफत ठेवलं आहे. हिऱ्यांचे दागिने खरेदी करायचे असतील तर औरा ज्वेलरीनं २५ टक्के डिस्काऊंट ठेवला आहे.
मुंबईसारखचं अहमदाबादमध्येही ज्वेलर्सनी ऑफर्स आणल्या आहेत. अहमदाबादमध्ये फॉरेव्हर ज्वेलरीनं दागिन्यांच्या करणावळीवर ५० टक्के तर जशूभाई ज्वेलर्सनं करणावळीवर ३५ टक्के सूट दिली आहे. भोपाळमध्येही व्यावसायिकांनी अनेक योजना आणल्या आहेत. तनिष्क ज्वेलरीत ८ ग्रॅम सोनं तर पीसी ज्वेलर्समध्ये ५० हजाराच्या सोने खरेदीवर १ सोन्याचे नाणं दिलं जाणार आहे. शहरातले इतर काही सराफांनी खरेदीवर पाच टक्के डिस्काऊंट ठेवला आहे. ग्राहकांसाठी आणलेल्या या योजनांमुळं अक्षय्य तृतीयेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा सराफांना आहे.