सिंघवींची ‘काम’गिरी, आता गेले कायमचे ‘घऱी’!

कथित सेक्स सीडी प्रकरणानंतर काँग्रेसचे प्रवक्ता आणि संसदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक मनु सिंघवी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Updated: Apr 23, 2012, 08:55 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

कथित सेक्स सीडी प्रकरणानंतर काँग्रेसचे प्रवक्ता आणि संसदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक मनु सिंघवी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

 

एका अज्ञाताने युट्यूबवर राज्यसभेचे खासदार आणि काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांची कथित सीडी अपलोड केली. सिंघवी यांना काँग्रेस पक्षातून सात दिवसांच्या आता काढून टाका, नाहीतर त्यांच्याशी संबंधित असलेल्या उर्वरित सेक्स सीडी आणि व्हिडिओ अपलोड करेन, अशी धमकी त्याने दिली होती.
सिंघवी व्हिडिओ नावाच्या फेसबुक अकाऊंटवरुन हा व्हिडिओ अपलोड केला गेला आहे. हे अकाऊंट १९ एप्रिल रोजी बनविले गेले आहे. त्यानंतर त्या व्हिडिओचे गूगल अकाऊंटवरुन पेज बनवून फेसबुकद्वारे हा व्हिडिओ लिंक केला गेला आहे. व्हिडिओ अपलोड करणा-याला माहित आहे की, हा व्हिडिओ ब्लॉक केला जाऊ शकतो. त्यामुळे अपलोड करणा-याने आपला ईमेल आयडी दिला आहे. तसेच ब्लॉक झाल्यास या आयडीवर व्हिडिओची मागणी करावी, असे म्हटले आहे. युट्यूब वरुन हा व्हिडिओ ब्लॉक केल्यानंतर त्याचे फेसबुक पेज बनविले गेले आहे. व्हिडिओ लोड करणा-या व्यक्तींने गंभीर इशारा दिला असून, जितक्या वेळा हा व्हिडिओ डिलिट कराल, तितक्याच वेळा ही साडी इतर वेबसाइटवर टाकली जाईल, असे म्हटले आहे.

 

 

व्हिडिओ पोस्ट करणा-या व्यक्तींने आणखी एक गंभीर इशारा देताना म्हटले आहे, जर आता हा व्हिडिओ हटविला गेला, तर केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा रशियातील वेश्येबरोबरचा व्हिडिओ पोस्ट करेन.

 

 

दिल्ली हाय कोर्टाने हा व्हिडिओ प्रसारित करण्यास निर्बंध घातल्यानंतरही सिंघवी यांची कथित अश्लील सीडी सार्वजनिक झाली आहे. ही सीडी युट्यूब आणि सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकच्या माध्ममातून पोस्ट केली गेली आहे. हा न्यायालयाचा अवमान असून, फेसबुक आणि युट्यूब यासारख्या वेबसाईटनी नियमाचे उल्लंघन केले आहे. ही घटना सायबर क्राईमअंतर्गतही येऊ शकते, अशी काँग्रेस वर्तुळात चर्चा आहे.