महायुतीत भाजपच मोठा भाऊ? मुंबईत शिवसेनेपेक्षा भाजप जास्त जागा लाढणार?

Maharashta Politics : मुंबईत भाजप मोठा भाऊ होणार आहे.  मुंबईतील 36 विधानसभेच्या जागांपैकी सर्वाधिक जागा भाजपच्या वाट्याला येणार आहे. महायुतीत मुंबईत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार पाहुयात   

राजीव कासले | Updated: Oct 19, 2024, 05:34 PM IST
महायुतीत भाजपच मोठा भाऊ? मुंबईत शिवसेनेपेक्षा भाजप जास्त जागा लाढणार? title=

कपिल राऊत झी मीडिया, मुंबई : मुंबई म्हणजे शिवसेना असं राजकीय गणित आहे. मग ती उद्धव ठाकरेंची शिवसेना (Shivsena UBT) असो की एकनाथ शिंदेंची (Shivsena Shinde Group0. पण आता महायुतीत ते चित्र राहिलं नाही. मुंबईतील जागावाटपात महायुतीत भाजपचं (BJP) मोठा भाऊ असल्याचं दिसतंय. कारण मुंबईतील विधानसभेच्या 36 जागांपैकी सर्वाधिक जागा भाजप लढणार असल्याची माहिती आहे. भाजपच्या वाट्याला विधानसभेच्या 36 पैकी 18 जागा येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं मुंबईत महायुतीत भाजप मोठा भाऊ ठरणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत भाजप 18 जागा लढणार आहे तर शिवसेना 16 आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला दोन जागा येणार आहेत. मुंबईत पहिल्यांदाच भाजप विधानसभेच्या सर्वाधिक जागा लढणार आहे.. महायुतीत झालेल्या जागावाटपात भाजपला सर्वाधिक जागा मिळणार आहे.  त्यामुळे राज्यासह मुंबईतही भाजप मोठा भाऊ होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

2019 विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेनं मुंबईत सर्वाधिक जागा लढवल्या होत्या. 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेच्या वाट्याला सर्वाधिक जागा आल्या होत्या. 2019 साली शिवसेने मुंबईत 19 जागा लढल्या होत्या. भाजपच्या वाट्याला विधानसभेच्या 17 जागा आल्या होत्या. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला मुंबईत कमी जागा येणार आहे. त्यामुळे भाजपचं वजन मुंबईत वाढणार असल्याची चर्चा आहे.

पुढील काही दिवसात मुंबईतील महायुतीच्या जागांवर शिक्कामोर्तब होणार आहे. भाजपच्या वाट्याला मुंबईत सर्वाधिक जागा जाणार आहे. त्यामुळे मुंबई पालिकेच्या निवडणुकीतही  भाजप मोठा भाऊ मुंबई होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे..