Pankaj Tripathi : गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्री 'मिर्जापुर' फेम अभिनेता पंकज त्रिपाठी हे चाहत्यांच्या मनात स्वत: चं एक स्थान निर्माण केलं आहे. पंकज त्रिपाठी आणि मृदुला यांच्या लग्नाला 21 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यासाठी त्यांनी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. त्याचे फोटो पंकज त्रिपाठी यांची पत्नी मृदुला यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मृदुला यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये पंकजला पाहिल्यानंतर हे सांगणं चुकीचं नाही की त्यांनी पुन्हा एकदा ते उत्तम अभिनेते आहे. फक्त उत्तम अभिनेता नाही तर आदर्श पती देखील असल्याचं त्यांनी सांगितलं. पंकज आणि त्यांची पत्नी मृदुला यांनी 15 जानेवारी रोजी त्यांच्या लग्नाचा 21 वा वाढदिवस साजरा केला. या निमित्तानं मृदुलानं शनिवारी एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. तो व्हिडीओ पाहून चाहते भावूक झाले आहेत. व्हिडीओमधअये सगळ्यात आधी पंकजनं मृदुला यांना अंगठी घातली. यावेळी ते लाजताना दिसले.
त्यानंतर मृदुलासमोर हात जोडल्याचे दिसते. त्यामुळे त्यांच्या साधे पणानं सगळ्यांची मने जिंकली. पंकज यांनी एगदी साधारण स्टाइलमध्ये कपडे परिधान केले होते. तर मृदुलानं पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. त्यानंतर दोघांनी एकामेकांना मिठी मारली आणि केक कापला. पाहुण्यांनी टाळ्या वाजवत त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला त्यांची लेक, आशी त्रिपाठी देखील या खास निमित्तानं त्यांच्यासोबत होती.
हेही वाचा : सैफच्या उपचारांवर 36 लाखांचा खर्च; 25 लाख कॅशलेस मिळाल्याचं पाहून डॉक्टर म्हणाले, 'मध्यमवर्गीयांना...'
पार्टीचे फोटो शेअर करत मृदुलानं कॅप्शन दिलं की अशा प्रकारे आम्ही 21 वर्ष पूर्ण केली. पंकज त्रिपाठी आणि मृदुला यांची लव्ह स्टोरी ही कोणत्याही चित्रपटापेक्षा कमी नाही. दोघं पहिल्यांदा तेव्हा भेटले जेव्हा मृदुला या 9 वीत शिकत होत्या आणि पंकज हे 11 वीत होते. हळूहळू मैत्रिचं रुपांतर प्रेमात झालं. कुटुंह आणि समाजातिल असमानतेवरून त्यांना भीती वाटत होती की त्यांचं नातं स्वीकारणार नाही. 14 जानेवारी 2004 मध्ये त्या दोघांनी लग्न केलं आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यातील खरा संघर्ष हा सुरु झाला.