खालापूर तहसीलदारांनी मागितली १० लाखांची लाच, गुन्हा दाखल

  लाच मागितल्याप्रकरणी ठाणे लाचलुचपत विभागाने रायगड जिल्ह्याच्या खालापूर तहसीलदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

Updated: Apr 19, 2018, 10:58 AM IST
खालापूर तहसीलदारांनी मागितली १० लाखांची लाच, गुन्हा दाखल title=

रायगड : कर्जत प्रांताधिकारी यांच्या महसूल न्यायालयात प्रलंबित असलेल्या जमिनिबाबतच्या दाव्यात तक्रारदार यांच्या बाजूने निर्णय देण्याकरिता कर्जत प्रांतधिकारी यांना द्यायला आणि स्वतः साठी असे तब्बल १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी ठाणे लाचलुचपत विभागाने रायगड जिल्ह्याच्या खालापूर तहसीलदार राजेंद्र चव्हाणांवर खालापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.

कर्जत खालापूर परिवारात जमीनीला सोन्याचा भाव असल्याने अनेक प्रकरणात महसूल विभाग आपले उखळ पांढरे करण्यात मश्गुल असते या पूर्वी ही जमीन दावे निकालात लाच मगितल्याच्या अनेक तक्रारी आहेत .

खालापूर तहसीलदार वर गुन्हा दाखल झाल्याने रायगड महसूल विभागात खळबळ उडाली असून तजसीलदार फरार झाला आहे तर कर्जत प्रांताधिकारी  दत्ता भडकवाड यांची ही चौकशी होणार आहे.