Satara Crime News: साताऱ्यातील वाई न्यायालय परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. कुविख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी जाधव आणि दोघांवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबार करणारे दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. न्यायालयीन परिसरात भरदिवसा गोळीबार झाल्याने आता कायदा आणि सुव्यवस्थेचा तीन तेरा वाजलेत का? असा सवाल आता सातारकर उपस्थित करताना दिसत आहेत.
काही वेळापूर्वी ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. कुविख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी जाधव आणि त्याचे दोन मित्र निखिल आणि अनिकेत मोरे या तिघांवर अज्ञात लोकांनी गोळीबार केला. न्यायालयीन परिसरात उपस्थित असलेल्या पोलिसांनी लगेच आरोपांना ताब्यात घेतलं. मात्र, या घटनेमध्ये अद्याप कोणीही जखमी झालं नसल्याचं समजतंय. हा गोळीबार का करण्यात आला? यामागील कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र, या घटनेनंतर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाला होतं.
मेनवली येथील हॉटेल माधवन इन्टणेशनलच्या मालकास मागितलेल्या खंडणी प्रकरणी अनिकेत उर्फ बंटी जाधव, निखिल मोरे, अभिषेक मोरे यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना मागील सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर केलं असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. बंटी जाधवला पाहण्यासाठी युवकांनी न्यायालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यामुळे साताऱ्यात नेमकं चाललंय काय? असा सवाल विचारला जात आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील कराड शहरातील गुरूवार पेठेत राहणाऱ्या आयेजरजा मुजावर याच्या मित्राचा शिवराज माने याच्याशी यापूर्वी वाद झाला होता. त्यावेळी हत्या करण्याच्या उद्देशाने युवकावर धारदार कोयत्याने वार करण्यात आले होते. अशातच आता भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना घडल्याने सर्वांनी नाराजी व्यक्त केली आहे.