देवेंद्र फडणवीस यांना चिडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण ?

याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

Updated: May 2, 2021, 10:10 AM IST
देवेंद्र फडणवीस यांना चिडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण ? title=

नाशिक : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) हे नाशिक येथील कोविड रुग्णालयात (Covid19 Hospital) पाहणीसाठी गेले असताना काही जणांनी अश्लाघ्य भाषेत त्यांच्यावर टिप्पणी केली. करत व्हिडीओ बनवला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

देवेंद्र फडणीस यांनी 30 एप्रिलला नाशिक महानगरपालिकेच्या बिटको कोविड रुग्णालयाला भेट देऊन तेथील वैद्यकीय सुविधांचा आढावा घेतला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत गिरीश महाजन देखील होते. 

देवेंद्र फडवणीस बिटको रुग्णालयात प्रवेश करत असताना काहीजण त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करत होते. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी याचा व्हिडीओ देखील बनवला. फडणवीस हे आढावा घेत असताना काही व्यक्तींनी व्हिडिओ काढून देवेंद्र फडवणीस यांना चिडवत होते. हे या व्हिडिओच्या चित्रीकरणात दिसतंय. 

व्हिडिओमध्ये देवेंद्र फडवणीस यांच्यावर शिवराळ टिप्पणी करण्यात आलीय. दरम्यान पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन 2 दिवसांच्या आत गुन्हा दाखल करण्यात आलाय.