आजपासून खरंच एसटीचे तिकीट महागले? अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं...

ST Bus Fare: सर्वसामान्यांसाठी लाईफलाईन असणाऱ्या एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना एसटीची भाडेवाढ झाल्याची चर्चा समोर येत होत्या. त्यावर आज उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 25, 2025, 11:49 AM IST
आजपासून खरंच एसटीचे तिकीट महागले? अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं...  title=
Maharashtra dcm reaction over Maharashtra ST Bus Fare Hike

ST Bus Fare: एसटी महामंडळाने आजपासून प्रवासी भाडेवाढ होण्याची घोषणा केली आहे. आजपासून एसटीने 15 टक्क्यांची भाडेवाढ लागू केली आहे. मात्र या एसटी भाडेवाढबाबत संभ्रम असल्याचे पाहायला मिळतेय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र अद्याप भाडेवाढ करण्यात आली नाही, असं म्हटलं आहे. त्यामुळं एसटीची भाडेवाढीबाबत संभ्रम पाहायला मिळत आहे. 

अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांना एसटीच्या भाडेवाढीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी भाडेवाढीबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही, असं म्हटलं आहे. 

'एसटी भाडेवाढीच्या बाबत जास्तीत जास्त बसेसे घेऊन ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील लोकांना उत्तम सेवा द्यायची आहे. मात्र तशा पद्धतीने चर्चा अजून चालली आहे. अंतिम निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री दावोसवरुन आत्ताच आले आहेत. अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालूनच घेतला जाईल,' असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 

'एसटी भाडेवाडी बाबत अंतिम निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय होईल. जनता आणि महामंडळ दोघांच्या हिताचा विचार करून मध्यम मार्ग काढला जाईल. 
शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये एसटीची सेवा अधिकाअधिक प्रमाणात उपलब्ध करून देणे तसेच नवीन बसेस खरेदी करणे यासाठी भाडेवाडीचा प्रस्ताव आहे. मात्र अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्याचा असतो,' असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. 

बावनकुळे काय म्हणाले?

चंद्रशेखर बावनकुळे यांनीही एसटी भाडेवाढबाबत मला काही माहिती नाही, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. कोणताही भाडेवाढीचा किंवा जनतेशी निर्णय हे कॅबिनेटमध्येच होतात. पण अजित पवार, एकनाथ शिंदे आणि  देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली असेल एखाद्या वेळेस मला माहिती नाही. महायुतीचे निर्णय हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करूनच असे निर्णय झाले पाहिजे असे मला वाटते, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. 

एसटी भाडेवाढीबाबतचा निर्णय हा प्रस्तावित आहे. महामंडळाला नवीन बसेस घ्यायच्या आहेत त्यामुळं भाडेवाढ गरजेची आहे. मात्र हा निर्णय अद्याप प्रस्तावित आहे. मुख्यमंत्र्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळं एसटी भाडेवाढीबाबत अद्याप संभ्रम आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल.