Sanjay Raut On Walmik Karad: तहवूर राणावर न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे. अशा न्यायालयीन प्रक्रिया सुरूच असतात. अजून नीरव मोदी ला आणायचं आहे. दाऊद ला आणायचं आहे टायगर मेनन ला आणायचं आहे. यांची यादी मोठी असल्याचे संजय राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवरुन भाजपवर निशाणा साधलाय.
महाराष्ट्रातील नेत्यांवर चिखलफेक करण्यासाठी आणि महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी अमित शाह महाराष्ट्रात येतात. अमित शाह हे सहकार मंत्री आहेत. पण अमित शाह जन्मला आलेल नव्हते तेव्हा पासून या देशाचं सहकार मोठं आहेय अमित शाह म्हणतात ते काय मोठ नाही, असा टोला यावेळी राऊतांनी लगावला.
काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षात असलेल्या नेत्यांना फोडण्यासाठी आपल्याकडे असलेल्या सहकार कारखान्याचे संचालक यांच्यावर खोटे गुन्हा दाखल केले आणि दबाव आणले आहेत. अनेक कारखानदार या महाराष्ट्रात दिल्लीला बोलविले जाते. कारखानदारांवर दबाव आणला जात आहे ही मोडस ऑपरेंडी असल्याचा आरोप राऊतांनी केला. कोविड काळात गुजरात मधील सहकार बँकेत घोटाळे झाले हे जगाला माहित आहे. एक कारखाना बंद पडला तर हजार कुटुंबाचे नुकसान केले जात असल्याचेही ते पुढे म्हणाले.
अमित शाह हे भाजप नेते आहे. आम्ही त्यांच्यावर टीका केलीपण एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत मग त्यांना उत्तर द्यायची गरज नाही. एकनाथ शिंदे किस झाड की पत्ती आहेत. अमित शाह जमालगोटा कोणाला देणार आहेत हे पाहुया. जमालगोट्याच्या गोष्टी आम्हाला सांगू नका. तुम्हाला ईडीचा जमलगोटा दिला गेलाय. अमित शाह महाराष्ट्र तोडायला निघाले आहे, त्यांनी राज्याच्या अस्मितेवर पाय ठेवला आहे. एकनाथ शिंदे लाचार असल्याची टीका राऊतांनी केली. हे सरकार अत्यंत गोंधळलेल्या बाजूने आहे. ठाण्याचे मंत्री त्यांचे काय चालू आहे.आपापल्या गटाचा मुख्यमंत्री वेगळा आहे. देवेंद्र फडणवीस यांचे सरकारवर नियंत्रण नसल्याचेही ते म्हणाले.
यावेळी संजय राऊतांनी वाल्मिक कराडच्या संपतीवरुन भाजपवर निशाणा साधला. याआधी प्रफुल पटेल यांची संपत्ती जप्त झाली होती. ती सोडवली गेली. इतर सुद्धा काही लोक आहेत त्यांच्या संपत्तीवरती जप्तीच्या नोटीस आल्या होत्या आणि आता ते भाजपमध्ये गेले. वाल्मिकी कराड हा त्यांच्याच पक्षातील माणूस आहे. प्रफुल पटेल यांचीही साडेतीनशे कोटीची संपत्ती जप्त झाली होती. कोणाकोणाची संपत्ती जप्त झाली होती आणि मग भाजपमध्ये गेल्यावर कशी मोकळी झाली, आमच्याकडे अख्खी यादी असल्याचे राऊत म्हणाले. उद्याची लोकसभा आणि विधानसभा आली परत की वाल्मिकी कराड परत संत होणार आहे. भाजप त्याला संत पदाचा दर्जा देऊन महा मंडलेश्वर करेल, असा टोला राऊतांनी लगावला.