नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे. काँग्रेस उमेदवार आशिष देशमुख यांनी आक्षेप घेतला होता. निवडणूक अधिकाऱ्यांनी हा आक्षेप फेटाळला आहे. प्रतिज्ञापत्रावर २०१८ मधील जुना नोटरी स्टॅम्प लावल्याचा आक्षेप घेतला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज अखेर वैध ठरला आहे. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी हा निर्णय दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेस उमेदवार आशिष देशमुख आणि अपक्ष उमेदवार प्रशांत पवार यांनी आक्षेप घेतला होता.
२८ डिसेंबर २०१८ मध्ये नोटरीची मुदत संपली असताना मुख्यमंत्र्यांच्या प्रतिज्ञापत्रावर जुनाच स्टॅम्प वापरल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली होती. मात्र हे आक्षेप फेटाळून लावून, मुख्यमंत्र्यांची उमेदवारी वैध ठरवण्यात आली.