Healthy benefits and uses of pea peel: हिवाळ्यात हिरवेगार वाटाणे मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. वाटाणे सोलल्यानंतर त्यांची साले फेकून दिली जातात, पण यापुढे असे करू नका. तुम्हाला माहिती आहे का? वाटाण्याची साले तुमच्या पोळीचा स्वाद वाढवू शकतात. तसेच, त्या व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत आहेत. घरीच वटाण्यांच्या सालीचे पावडर बनवून तुम्ही त्याचे आरोग्यदायी फायदे घेऊ शकता.
आहार तज्ज्ञांच्या मते, वटाण्याच्या साली सोलून चांगल्या प्रकारे सुकवा, त्यानंतर त्यांना वाटून पावडर बनवा. ही पावडर पोळीच्या पिठात मिसळून पोळ्या तयार करा. पोळ बनवताना लाटण्यात लावल्या जाणाऱ्या पिठात वाटण्याच्या सालीचे पावडर मिसळून पोळी बनवता येते. यामुळे शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता कधीच जाणवणार नाही.
या नव्या पद्धतीने पावडर बनवणे अगदी सोपे आहे. तसेच या नैसर्गिक पद्धतीने बनवल्याल्या पावडरचे कोणतेच विपरित परिणाम होत नाहीत. वाटाण्याच्या सालींना एक लिटर पाण्यात चिमूटभर मीठ घालून उन्हात वाळायला ठेवा. पण वाळवताना तापमान 40 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त नसावे. म्हणजे अगदी कडक उन्हात ठेऊ नका.
1. मटारामध्ये 40-50 टक्के फायबर असते, जे शरीराला ऊर्जा देण्यत मदत करते.
2. बद्धकोष्ठता, कोलेस्ट्रॉल, आणि साखरेसारख्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी वाटाण्यच्या सालीचे पावडर घरच्या घरी तयार करून दैनंदिन आहारात समाविष्ट करा.
3. चांगल्या आरोग्यासाठी वटाण्याच्या सालीचे पावडर हा सोपा आणि फायदेशीर पर्याय ठरू शकतो.
हे ही वाचा: हिवाळ्यात शरीराला आवश्यक उष्णता देईल ही लसणाची झणझणीत चटणी, नक्कीच ट्राय करा
वाटाण्याच्या सालींचा वापर त्वचा उजळवण्यासाठीदेखील केला जातो. या गुणकारी सालींपासून फेस पॅक बनवून लावा.
1. वाटाणा आणि संत्र्याची साल एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा.
2. ही पेस्ट चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटांसाठी लावा.
3. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून टाका.
4. आठवड्यातून दोनदा हा फेस पॅक लावल्याने अनेक फायदे पाहायला मिळतात.