भाविकांवर काळाचा घाला! नाशकात भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर जखमी

Nashik Accident News Today: भाविकांवर काळाचा घाला, नाशकात भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर जखमी

Updated: Apr 5, 2024, 04:39 PM IST
 भाविकांवर काळाचा घाला! नाशकात भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर जखमी title=
Bolero two wheeler accident on Nashik Dindori road five people died

Nashik Accident News: नाशिकच्या दिंडोरी म्हसरुळ रोडवरील जानोरी फाट्याजवळ एक भीषण अपघात झाला आहे. बोलेरो जीप आणि दुचाकीच्या अपघातात पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. दुपारी 2 वाजेच्या दरम्यान हा अपघात घडला आहे. जखमींना म्हसरूळ येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. (Nashik News)

बोलेरो जीपमधून काही भाविक सप्तश्रृंगी देवीचं दर्शन घेऊन परतत होते. या बोलेरो जीपच्या चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रत्यक्षदर्शी आणि मदतकार्य करणाऱ्या व्यक्तींनी व्यक्त केला आहे. दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. रुग्णवाहिकादेखील उशिरा आल्याचा आरोप करत मदतकार्य करणाऱ्या व्यक्तींनी केला आहे. 

नाशिक-दिंडोरी मार्गावर ढकांबे गावाजवळ बोलोरे गाडी आणि दुचाकीचा अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरशः चक्काचुर झाला आहे. टायर फुटल्यामुळं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिस आणि स्थानिकांनी मदतकार्य सुरू केले आहे. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, मृतदेह नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहेत. 

पुण्यात अपघात 

पुण्यात भरधाव कारने दोघांना उडवले. पिकॉक हॉटेलच्यासमोर पायी चाललेल्या दोन तरुणांना भरधाव कारने धडक दिली आहे. गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. अपघातात दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताचे सीसीटिव्ही फुटेज समोर आले आहेत. उत्तम नगर पोलिसांकडून कार चालकाचा शोध सुरू आहे.