भाजपच्या दिग्गज नेत्याच्या गाडीला अपघात, 2 जखमी

भाजपच्या (Bjp) बड्या नेत्याच्या गाडीला अपघात झाला आहे.

Updated: Oct 15, 2022, 11:41 PM IST
 भाजपच्या दिग्गज नेत्याच्या गाडीला अपघात, 2 जखमी title=

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड :  राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. भाजपच्या (Bjp) बड्या नेत्याच्या गाडीला अपघात झाला आहे. भाजप प्रदेशउपाध्यक्ष माधव भंडारी (Bjp Vice State President) यांच्या वाहनाचा झाला आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे. (bjp state vice president madhav bhandari vehicle met with an accident in beed)

नक्की काय झालं? 

माधव भंडारी (Madhav Bhandari)  बीडहुन (Beed) अंबाजोगाईच्या (Ambajogai) दिशेने जात होते. या दरम्यान मस्साजोगजवळ (Massajog) हा अपघात झाला. ॲपेरिक्षा (Ape Rickshaw) भंडारी यांच्या वाहनावर येऊन आदळली.  सुदैवाने माधव भंडारी आणि प्रवक्ते राम कुलकर्णी हे सुखरूप आहेत. मात्र ॲपेरिक्षाचालकासह दोन प्रवासी जखमी झाले आहेत.