ओ वाचवा... ड्रायव्हर किडनॅप करतोयssss, पुण्यातील PMPML प्रवाशाचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल!

ओ वाचवा... बस चालक त्रास देतोयssss उतरु देत नायssss ड्रायव्हर किडनॅप करतोय, अशी आरडाओरड प्रवाशाने सुरू केली.  पण ड्रायव्हर बी बारा गावचं पाणी पिलेला...

Updated: Oct 15, 2022, 10:58 PM IST
ओ वाचवा... ड्रायव्हर किडनॅप करतोयssss, पुण्यातील PMPML प्रवाशाचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल! title=

Pune PMPML Video: पुण्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल झालाय. हा व्हिडीओ एका पुण्याची लाईफलाईन असलेल्या पीएमपीएमएल बसमधील (PMPML Bus) आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक प्रवासी बसमध्ये आरडाओरडा करताना दिसतोय. मला वाचवा, ड्रायव्हर किडनॅप करतोय, अशी आरडाओरड प्रवाशाकडून सुरू असल्याचं पहायला मिळतंय. अनेकांच्या स्टेटसवर आणि ट्विटरवर हा व्हिडीओ व्हायरल झाल्याचं पहायला मिळतंय.

नेमकं काय झालं?

बस चालक (Bus Driver) उतरू देत नसल्यानं प्रवाशानं बोंबाबोंब केली. त्यावेळी बसमधील प्रवाशानं व्हिडीओ काढला. तो आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय. चिंचवडहून बालेवाडीला जात असलेल्या पीएमपीएमएलच्या बसमध्ये (Pmpml Bus Video) हा प्रकार घडला. बस न थांबवल्याने प्रवाशाने आरडाओरड सुरू केली.

पुण्यात काही ठराविक अंतरावर बस स्टॉप ठरून दिलेले असतात. दोन स्टॉपच्या मध्ये एका ठिकाणी ही बस थांबली. त्यावेळी एका प्रवाशानं ड्रायव्हरला दरवाजा उघडण्यास सांगितलं. मात्र, बस बसस्टॉपला न असल्याने चालकाने दरवाजा उघडण्यास नकार दिला. बसचा दरवाजा केवळ स्टॉपवरच थांबेल असं उत्तर चालकानं दिलं. त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. 

आणखी वाचा - Raj Thackeray : ठाकरे-शिंदेंमध्ये तासभर खलबतं, भेटीमागचं नेमकं 'राज' काय?

वाद पेटल्यानंतर हे प्रकरण पुढे शिवीगाळ करण्यापर्यंत पोहोचलं. संतप्त प्रवाशी डॅशबोर्डवर हात मारू लागला. बसमधील इतर प्रवाशांनी त्याला शांत राहण्यास सांगितलं. मात्र त्यानं कोणाचं ऐकलं तर ना... त्यानं आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अनेकांनी संधी साधत फोनमध्ये व्हिडीओ काढून घेतला.

पाहा व्हिडीओ - 

ओ वाचवा... बस चालक त्रास देतोयssss उतरु देत नायssss ड्रायव्हर किडनॅप करतोय, अशी आरडाओरड प्रवाशाने सुरू केली. पण ड्रायव्हर बी बारा गावचं पाणी पिलेला... त्यानं पण बस थांबवलीच नाय. त्यानं थेट बस स्टॉपवरच बस थांबवली. गडी खाली उतरल्यानंतर एकच हशा पिकल्याचं पहायला मिळालं. असं असलं तरी हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाल्याचं पहायला मिळतंय.