'हा' आहे जगातील सर्वात उंच रेल्वे पूल, पॅरिसच्या प्रसिद्ध आयफेल टॉवरपेक्षा उंच

 Worlds Largest Rail Bridge: हा रेल्वे पूल पॅरिसच्या प्रसिद्ध आयफेल टॉवरपेक्षा उंच आहे. आयफेल टॉवरची उंची केवळ 330 मीटर आहे आणि या  रेल्वे पुलाची उंची 359 मीटर आहे. हा पूल ताशी 100 किलोमीटर ट्रेनच्या वेगासाठी तयार करण्यात आला आहे.  

तेजश्री गायकवाड | Updated: Jan 19, 2025, 10:48 AM IST
'हा' आहे जगातील सर्वात उंच रेल्वे पूल, पॅरिसच्या प्रसिद्ध आयफेल टॉवरपेक्षा उंच   title=

The Chenab Rail Bridge in Jammu and Kashmir: देशातील अभियांत्रिकीचे सर्वात मोठे उदाहरण बघायचे असेल तर तुम्ही आवर्जून चिनाब रेल्वे ब्रिज बघायला जायला हवं. हा ब्रिज जम्मू-काश्मीरमध्ये आहे. याचे काही काळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल ठरला आहे. अलीकडेच या पुलावर पहिल्या ट्रेनची यशस्वी चाचणीही पूर्ण झाली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही सोशल मीडियावर ही माहिती दिली होती. या पुलाच्या आजूबाजूच्या सुंदर हिरवळीचे सौंदर्य  तुमचे मन प्रसन्न होईल.

डोंगराच्या मधोमध बांधलाय हा पूल

डोंगराच्या मधोमध बांधलेला हा रेल्वे पूल अतिशय आकर्षक दिसतो. त्याची डिझाईन पर्यटकांना आकर्षित करते. देशाच्या दृष्टीने हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण चिनाब रेल्वे पूल हा उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा एक भाग आहे. हा प्रकल्प काश्मीर खोऱ्याला उर्वरित भारताशी जोडण्याचे काम करते. हा रेल्वे पूल चिनाब नदीवर बांधला आहे. या रेल्वे पुलाची उंची सुमारे 1,178 फूट (359 मीटर) आहे.

हे ही वाचा: Photo: 22 बायका, 100 मुलं... जगाला सर्वात श्रीमंत देश देणारा राजा कोण होता?

 

हे ही वाचा: शास्त्रानुसार अंघोळ करताना शरीराच्या कोणत्या भागावर आधी पाणी टाकावे? 

 

प्र​सिद्ध आयफेल टॉवरपेक्षा उंच

हा रेल्वे पूल पॅरिसच्या प्रसिद्ध आयफेल टॉवरपेक्षा उंच आहे. आयफेल टॉवरची उंची केवळ 330 मीटर आहे आणि चिनाब रेल्वे पुलाची उंची 359 मीटर आहे. हा पूल ताशी 100 किलोमीटर ट्रेनच्या वेगासाठी तयार करण्यात आला आहे. 2002 साली पुलाचे बांधकाम सुरू झाले. हा पूल म्हणजे अभियांत्रिकीचे अप्रतिम उदाहरण आहे. ते बांधण्यासाठी एकूण 18 खांब बांधण्यात आले आहेत. पूल बांधण्यासाठी 27 हजार टनांहून अधिक स्टीलचा वापर करण्यात आला आहे.
हा पूल पर्यटकांमध्येही प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनला आहे. ते पाहण्यासाठी लांबून पर्यटक येतात. चिनाब रेल्वे पुलाच्या सभोवतालचे सौंदर्य आणि दृश्ये पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात.