मुंबई : बिहारच्या राजकारणात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. पुढचे 48 तास भाजप-जेडीयू युतीसाठी महत्त्वाचे असणार आहेत. ज्या प्रमाणे महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला तसाच काही भूकंप बिहारच्या राजकारणात ही होण्याची शक्यता आहेय पण यामध्ये धक्का हा भाजपला बसणार आहे. कारण मुख्यमंत्री नीतीश कुमार पुन्हा एकदा राजद सोबत जाण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार बिहारच्या राजकारणात हालचालींना वेग आला असून भाजप आणि जेडीयू यांच्यातील युती शेवटची घटिका मोजत असल्याचं बोललं जात आहे.
काँग्रेसचे प्रभारी देखील पटनाला रवाना झाले आहेत. जेडीयूने देखील आपल्या खासदारांना सोमवारी संध्याकाळी पटना येथे येण्यास सांगितले आहे. काँग्रेसने मंगळवारी आमदारांची बैठक बोलावली आहे. आरजेडीने देखील आपल्या सर्व आमदारांना पुढचे काही दिवस पटनामध्ये राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
2017 मध्ये महाआघाडी पासून वेगळे झाल्यानंतर जेडीयू एनडीएमध्ये सहभागी झाली होती. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत महाआघाडी बनली होती. पण नंतर जेडीयू यातून बाहेर पडली आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक बैठकांना मुख्यमंत्री नीतीश कुमार हे सहभागी झाले नव्हते. जेडीयूने दोन मंत्री पदाची मागणी केली होती. पण भाजपने ती नाकारली होती.
राज्यात शिक्षण मंत्री आणि जदयू नेता विजय कुमार चौधरी यांना सांगितले की, आम्ही नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये सहभागी होणार नाही. जेडीयूला भाजपकडून सन्मान मिळण्याची आशा होती पण असं झालं नाही. त्यामुळे आम्ही नरेंद्र मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नाहीत. पण याचा राज्यातील सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही असं देखील त्यांनी म्हटलं होतं.
पुढील 2 दिवसात जेडीयू भाजप सोबतची युती तोडून आरजेडी सोबत सरकार स्थापन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.