धक्कादायक! मित्रानेच कापला मित्राचा गळा; हैवानाप्रमाणे प्यायला रक्त

Karnataka Crime : माथेफिरुने गळा चिरल्यानंतर रक्त प्यायला सुरुवात केली. त्यानंतर तिथेच असलेल्या दुसऱ्या मित्राने हा व्हिडीओ मोबाईलवर शूट केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 26, 2023, 09:41 AM IST
धक्कादायक! मित्रानेच कापला मित्राचा गळा; हैवानाप्रमाणे प्यायला रक्त title=

Crime News : हिंदी चित्रपटांमध्ये तुम्ही मे तेरा खून पी जाऊंगा असा काहीसा डायलॉग तुम्ही अनेकदा ऐकला असेल. पण कर्नाटकात (Karnataka Crime)  प्रत्यक्षात असाच काहीसा धक्कादायक प्रकार घडलाय. कर्नाटकातील चिक्कबल्लापूरमध्ये (Chickballapura) एका माथेफिरुने त्याच्याच मित्राचा गळा चिरत त्याचे रक्त प्यायला सुरुवात केली. चार दिवसांपूर्वी कर्नाटकता हा सगळा भीषण प्रकार घडलाय. मित्राचा गळा चिरून रक्त प्यायलेली व्यक्ती जिवंत असून त्याला पोलिसांनी  (Karnataka Police) अटक केली आहे. त्याचवेळी जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कर्नाटकातील चिक्कबल्लापूर येथे एका व्यक्तीने एका व्यक्तीचा गळा चिरून त्याचे रक्त प्यायले होते. धक्कादायक बाब म्हणजे त्याच्याच मित्राने ही घटना त्याच्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. विजय नावाच्या आरोपीने मारेश नावाच्या व्यक्तीचा गळा चिरला आणि सांडलेले रक्त प्यायला सुरुवात केली. पत्नीचे मारेशसोबत अवैध संबंध असल्याचा संशयावरुन विजयने हे खळबळजनक कृत्य केले आहे.

चिंतामणी तालुका बाटलाहल्ली येथील रहिवासी असलेल्या विजयने चार दिवसांपूर्वी चेलूर तालुक्यातील माडेमपल्ली येथील रहिवासी मरेश याच्यावर हल्ला केला होता. विजयने चाकूने मारेशचा गळा चिरला. यानंतर विजयने मारेशच्या गळ्यातून रक्त पिण्याचा प्रयत्न सुरू केला. विजय एवढ्यावरच थांबवला नाही. त्याने मारेशचा गळा चिरल्यानंतर विजयने त्याला मारहाण देखील केली. त्यावेळी मारेश गंभीर जखमी झाल्याने मदतीसाठी आरडाओरड करत होता. विजयच्या या क्रूर कृत्याचा व्हिडिओ तिथेच उपस्थित असलेल्या त्याच्या बनवला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी याप्रकरणी विजयला अटक केली आहे.

19 जून रोजी विजय हा त्याचा मित्र जॉन याच्यासोबत मारेशला जवळच्या जंगलात घेऊन गेला आणि तेथे त्याने मारेशचा गळा चिरून त्याचे रक्त प्यायले. जॉनने हे कृत्य त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. या घटनेत पीडित मारेश जखमी झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर मारेशने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी विजयला अटक केली आहे.

पत्नीशी संबंध असल्याच्या रागातून विजयने हे कृत्य केल्याचे म्हटलं जात आहे. याच रागातून विजयने मारेशला चिंतामणी तालुक्यातील सिद्धेपल्ली क्रॉसजवळील जंगलात बोलावून घेतले होते. मारेश तेथे पोहोचल्यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण झाले आणि प्रकरण इतके वाढले की विजयने चाकू काढून मारेशचा गळा चिरला. मारेश खाली पडताच विजय त्याच्याजवळ गेला आणि त्याच्या घशातून वाहतं रक्त पिऊ लागला. खळबळजनक बाब म्हणजे हा सगळा प्रकार घडला तेव्हा विजयची पत्नी देखील तिथेच होती. विजयने तिच्यावरही हल्ला केला. मात्र तिसुद्धा या हल्ल्यातून बचावली आहे.