Viral Video : सोशल मीडियावर एका शिक्षक आणि शिक्षिकेचा धक्कादायक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ राजस्थानमधील चित्तौडगड जिल्ह्यातील सालेरा गावातील एका शाळेतील आहे. या व्हिडीओमध्ये शिक्षक आणि शिक्षिकेने सर्व मर्यादा पार केल्या आहेत. शाळेतील कार्यालयात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात यांचं अश्लिल कृत्य कैद झालंय. या घटनेनंतर पालकांसह ग्रामस्थ संतप्त झाले असून या दोघांच्या बडतर्फ मागणी करत आहेत. दरम्यान शाळेने या प्रकरणानंतर या दोघांनाही निलंबित केलंय.
सालेरा गावातील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातील या व्हिडीओने सर्वत्र खळबळ माजली आहे. जे शिक्षक विद्यार्थ्यांचे आदर्श असतात, त्यांचे हे असे लाजिरवाणी आणि अश्लिल कृत्यामुळे शिक्षकपेशाला काळीमा फासली आहे. शाळेतील कार्यालयातील सीसीटीव्हीत त्यांचे एकदा नाही दोनदा नाही, अनेक वेळा त्यांचे अश्लिल कृत्य कैद झाले आहे. आक्षेपार्ह असे कृत्य कधी कार्यालयाच्या एका कोपऱ्यात तर कधी खुर्चीवर तर कधी त्या कोपऱ्यात करताना पाहिला मिळतेय.
खरं तर शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षक आणि शिक्षिकेवर संशय होता. या विद्यार्थ्यांनी पालकांना शिक्षकांच्या अश्लिल कृत्याबद्दल सांगितल्यावर ठोस पुरावे गोळा करण्याचा डाव त्यांनी आखला.
त्यानंतर कुटुंबियांनी आपापल्या स्तरावर कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला. या सीसीटीव्हीमधील फूटेजच्या आधारे पालकांनी गांगर पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार नोंदवली. चित्तोडगडचे जिल्हा शिक्षणाधिकारी राजेंद्र कुमार शर्मा यांनी या शिक्षिकेच्या निलंबन केलंय. मात्र शिक्षण विभागाने तातडीने कारवाई करत या प्रकरणाची चौकशी सुरू केली. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
या घटनेबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे शाळांमधील नैतिकता आणि शिस्तीच्या महत्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिक्षण मंदिराचे पावित्र्य अबाधित राहावे यासाठी अशा प्रकरणांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.