पहिला पाऊस आणि ते दोघं...भररस्त्यात कपलचा रोमान्स करतानाचा Video Viral

Viral Video : अखेर वरुणराजाचं (monsoon) आगमन झालं आहे. पहिला पाऊस आणि पहिली आठवण...प्रत्येक प्रेम करणाऱ्यांसाठी पाऊस हा जिव्हाळा विषय...अशात गर्लफ्रेंड सोबत असताना पहिल्या पावसात रोमान्स करताना एक कपलचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jun 26, 2023, 09:02 AM IST
पहिला पाऊस आणि ते दोघं...भररस्त्यात कपलचा रोमान्स करतानाचा Video Viral title=
monsoon couple romantic dance on road in first rain video goes viral on social media today trending video

Viral Dance Video : रिम-झिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन
भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन
रिम-झिम गिरे सावन ...

प्रेम आणि पाऊस यांचा खूप जवळचा संबंध आहे. चित्रपटात पावसात रोमान्स करतानाचे अनेक अभिनेत्री अभिनेत्यांचे गाणे प्रसिद्ध आहे. अमिताभ आणि स्मिता पाटील यांचं आज फिसल जाए तो हमें ना उठाइए असो किंवा अक्षय आणि रविनाचं टिप टिप बरसा पाणी...(Couple viral video)

पाऊस आणि कपलचं रोमाँटिक होणं तर बनता है...प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी पाऊस जणू काही जिव्हाळ्याचा विषय आहे. पावसातील जोडीदारासोबतची पहिली आठवण ही खूप खास असते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये कपलचा रोमँटिक क्षण पाहून प्रत्येकाला आपल्या जोडीदाराची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. (Romantic Dance In Rain Viral Video)

पाऊस हा रोमँटिक सिझन आहे असं म्हणतात...त्यामुळे प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी पहिला पावसात भिजण्याची मजाच काही औरच असते. या रोमँटिक वातावरणाचा परिणाम एका कपलवर झाला आणि त्यांनी भररस्त्यात दिवसाढवळा असं काही केलं की, सध्या सोशल मीडियावर त्यांचीच चर्चा आहे. अगदी सोशल मीडियावर या कपलचा व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये आहे. (monsoon couple romantic dance on road in first rain video goes viral on social media today trending video  )

पावसाच्या आगमाने सर्वजण सुखावले आहेत. जून महिना संपत आला तरी पावसाने पाठ फिरवली होती. अशात जेव्हा विकेंडला अचानक पावसाने हजेरी लावली रस्त्यावरुन जात असलेल्या कपलाही आनंद गगणात मावत नव्हतं. गर्लफ्रेंडच्या चेहऱ्यावर पहिल्या पावसाचं तो थेंब पाहून बॉयफ्रेंडच्या मनावरील ताब्या सुटला. कसली भान न राहता त्याने तिला जवळ खेचले आणि रोमान्सचा हा क्षण...

खरं तर हा कुठल्या चित्रपटाता सीन वाटेल किंवा सोशल मीडियावर टाकण्यासाठी बनवलेला रील वाटेल पण नाही थांबा...रिअर लाइफमधील कपलचं रोमान्स पाहून प्रत्येकाला आपल्या जोडीदाराची आठवण नक्की येईल. 

पाऊस आणि ते दोघे रस्त्याच्या मधोमध जगाची पर्वा न करता रोमँटिक डान्स करायला लागतात. कोणी तरी त्यांचं हे प्रेमाचं क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. 

हा व्हिडीओ इंदोरमधील भंवर कुआ भागातील असल्याचं ट्वीटरवर Shubham Rai या अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करताना सांगितलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. बेधुंद, प्रेमात पहिला पावसात रोमाँटिक डान्स करतानाचा या कपलचा व्हिडीओ हजारो यूजर्सला आवडतं आहे.