VIDEO VIRAL: त्यानं जीव वाचवण्यासाठी लाख प्रयत्न केले तरीही स्कॉर्पिओनं चिरडलंच!

Viral Video : कर्नाटकात पैशांच्या देवाणघेवाणीतून एकाची गाडीने चिरडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत व्यक्तीला गाडीने चिरडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.

आकाश नेटके | Updated: Nov 1, 2023, 11:48 AM IST
VIDEO VIRAL: त्यानं जीव वाचवण्यासाठी लाख प्रयत्न केले तरीही स्कॉर्पिओनं चिरडलंच! title=

Crime News : कर्नाटकातून (Karnataka) एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. कर्नाटकच्या बंगळुरुत (Bengaluru) एका स्कॉर्पिओ चालकाने एका व्यक्तीची गाडीखाली चिरडून हत्या केली आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. एका व्यक्तीने हा सगळा प्रकार त्याच्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून झालेल्या वादातून हा सगळा प्रकार घडल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी गाडीचालकाला अटक केली आहे.

18 ऑक्टोबर रोजी रात्री साडे बाराच्या सुमारास हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. अमरीन नावाच्या आरोपीने बंगळुरूमधील पुलकेशी नगरजवळ असगर नावाच्या तरुणाला त्याच्या स्कॉर्पिओ कारने चिरडल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. असगर अमरीनच्या गाडीपासून पळून जाण्याचा प्रयत्न होता. मात्र अमरीनने त्याला गाठून गाडीने त्याला चिरडलं आणि तिथून पळ काढला. सुरुवातीला आरोपीने हा अपघात असल्याचा दावा केला होता. मात्र, तपासादरम्यान असगरला जीवे मारण्याच्या उद्देशाने अमरीने गाडीने त्याला धडक दिली असा दावा केला जात आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार, मृत असगर हा जुन्या गाड्या विकण्याचे काम करत होता. अमरीनसोबत त्याची जुनी ओळख होती. आरोपीने असगरकडून कार खरेदी केली होती. मात्र त्याला चार लाख रुपये दिले नाहीत. पैशांवरून झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले होते. त्यानंतर आरोपीने असगरची गाडीने चिरडून हत्या केली.याप्रकरणी अमरीनविरोधात जेसी नगर पोलीस ठाण्यात कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अमरीनला अटक केली आहे.

मारहाणीच्या घटनेनंतर आरोपीने असगरला त्याच्याविरुद्ध केलेली तक्रार मागे घेण्यास सांगितले होते. याविषयी बोलण्यासाठी त्याने असगरला पुलकेशी नगरजवळ बोलवलं होतं.असगर जेव्हा त्याच्या एका मित्रासह तिथे पोहोचला तेव्हा अमरीनने त्याच्यावर गाडी चढवली आणि तिथून पळ काढला. असगरने वाचण्याचा बराच प्रयत्न केला मात्र अमरीनने त्याचा पाठलाग करुन त्याला चिरडलं आणि तिथून पळ काढला. सुरुवातीला वाहतूक पोलिसांनी या प्रकरणी रस्ता अपघाताची नोंद केली होती. मात्र व्हिडिओ समोर आल्यानंतर आणि असगरच्या मित्राच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी आरोपी अमरीन आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.