पाणी पिऊनही तुम्ही वजन कमी करु शकता, जाणून घ्या कसे ते?

Weight Loss : आजची जीवनशैलीमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. बदली लाईफस्टाईलमुळे वजन वाढ ही एक मोठी समस्या झाली आहे.  

Updated: May 14, 2022, 11:50 AM IST
पाणी पिऊनही तुम्ही वजन कमी करु शकता, जाणून घ्या कसे ते? title=

मुंबई : Weight Loss : आजची जीवनशैलीमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. बदली लाईफस्टाईलमुळे वजन वाढ ही एक मोठी समस्या झाली आहे. वाढत्या वजनामुळे अनेकांना नैराश्य येते तर काहींना वजन कमी करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. मात्र, वजन कमी करण्यासाठी एक सोपा उपाय आहे. वजन कमी करण्यासाठी पाणी पिणे हा एक चांगला पर्याय आहे. अशा स्थितीत स्त्री-पुरुषांनी किती पाणी प्यावे, हे जाणून घेतले पाहिजे, जेणेकरून वजन कमी करता येईल.

वजन कमी करण्यासाठी आपण कोणत्या गोष्टींचा प्रयत्न करतो हे आपल्याला माहीती नसते. कधी कधी आपण खाण्यापिण्याचे प्रमाण कमी करतो तर कधी आपल्या दैनंदिन दिनचर्येत गोष्टी जोडतो. पण तुम्हाला माहित आहे का,  फक्त पाणी तुमचे वजन कमी करु शकते. होय, तुम्हाला महागडे महागडे उपचार घेण्याची किंवा तुमच्या खाण्यापिण्यात काही गोष्टी कमी करण्याची गरज नाही. फक्त पाण्याने तुम्ही तुमचे वजन सहज कमी करु शकता. 

तुम्हाला आता प्रश्न असा पडला असेल की हे कसं काय शक्य? मात्र, पाणी तुमचे वजन कसे कमी करु शकते. वजन कमी करण्यासाठी पाण्याचा वापर कसा होतो, याच्या काही टीप्स लक्षात घ्या.

पाण्याचे सेवन केल्याने केवळ चयापचयच नाही तर ऊर्जा पातळीही वाढवता येते. या दोन्हींमध्ये सुधारणा केल्याने वजन सहज कमी होण्यास मदत होते. अशा परिस्थितीत जर आपण पुरुषांबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी किमान 3 लिटर आणि महिलांनी किमान 2 लिटर पाणी प्यावे. दुसरीकडे, जर एखाद्या व्यक्तीने अन्न खाण्यापूर्वी पाण्याचे सेवन केले तर ते कॅलरीज कमी करण्यास मदत करु शकते. अशा प्रकारे तुम्ही तुमचे वजन कमी करु शकता. अन्न खाण्यापूर्वी पाणी प्यायल्यास त्याची भूक नियंत्रित राहते आणि आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न खाण्यापासून रोखण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी असे पाणी प्या

वजन कमी करण्यासाठी हलके कोमट पाणी फायदेशीर आहे. याच्या मदतीने फक्त अन्नच सहज पचत नाही तर पाणीही सहज पचते. लक्षात ठेवा, तहान लागल्यावरच पाणी प्या आणि एका घोटाने किंवा दोन घोटाने तहान भागवू नका, तर भरपूर पाणी प्या. जर तुमच्या लघवीचा रंग पिवळा असेल तर याचा अर्थ तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या आहे, त्यामुळे भरपूर पाणी प्या.

 

 

(Disclaimer:येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)