मुंबई : त्वचेच्या आरोग्यासोबतच केसांची निगा राखणंही खूप गरजेचं आहे. चेहऱ्याचं सौंदर्य तेव्हाच दिसते जेव्हा आपले केस सुंदर असतात. कोरडे आणि पातळ केस कोणालाच आवडत नाहीत. केसांचा कोरडेपणा टाळण्यासाठी तुम्हीही विविध प्रोडक्ट्सचा वापर करत असाल. मात्र अशावेळी महिलांच्या मनात प्रश्न पडतो की केसांना तेल लावावं की सिरम?
आज जाणून घेऊया हेअर ऑइल आणि सिरमचे काय फायदे आहेत. शिवाय या दोघांपैकी तुमच्या केसांसाठी जास्त काय फायदेशीर आहे.
तेल हे एक पारंपारिक केसांची काळजी घेण्यासाठीचं प्रोडक्ट आहे. केसांची योग्यरित्या काळजी घेण्यासाठी तेल वापरण्याचा सल्ला दिला जातो. सीरम बाजारात तुलनेने नवीन आहे, जे एक विशेष प्रकारचे केसांचं टॉनिक आहे. हे केसांची शाईन वाढवतं आणि त्यांना एक स्मुथ लुक देतं.
हेअर ऑईल केसांना पोषण देतं आणि हे संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर आहे. केसांसाठी खोबरेल तेलाचा वापर केला जातो. यामुळे केस मजबूत करण्यास मदत होते. त्याच वेळी, ऑलिव्ह ऑईलमुळे केसांची वाढ होते. एरंडेल तेल केसांना स्मुथ आणि चमकदार बनवतं. दुसरीकडे जोजोबा तेल डॅमेज केस दुरुस्त करतात.
हेअर सीरम केसांवर एक थर म्हणून काम करते आणि ब्लो ड्राय, प्रदूषण, उष्णता इत्यादी हानिकारक गोष्टींपासून केसांचं संरक्षण करण्यासाठी काम करते. हे केसांना हायड्रेट ठेवण्यास मदत करतं. सीरमच्या वापराने तुमचे केसही चमकदार होतात. बाजारात अनेक सीरम उपलब्ध आहेत, जे तुमच्या केसांची काळजी घेण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.
केसांचं तेल आणि सीरम या दोन्हीचे वेगवेगळे फायदे आहेत. सध्या तुमच्या केसांना अधिक काळजीची गरज आहे. अशा परिस्थितीत तेल आणि सीरम दोन्ही तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. दोन्हीचा वापर केल्यास, ते केसांची क्वालिटी अधिक सुधारेल. यामुळे तुमच्या केसांना डीप कंडिशनर मिळेल आणि तुमचे केस मऊ आणि चमकदार राहतील.