कपिल शर्मा पुन्हा अफेअरमध्ये अडकणार? 9 वर्षांनंतर 'या' चित्रपटाच्या सिक्वेलचे शूटिंग सुरू

कॉमेडी किंग कपिल शर्मा पुन्हा एकदा आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. 2015 मध्ये आलेल्या चित्रपटाचा सिक्वेल चे शूटिंग सध्या मुंबईत सुरू आहे. या चित्रपटात कपिल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत आणि एकदा पुन्हा त्याच्या हशा आणि गोंधळाचा खळखळाट प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

Intern | Updated: Jan 25, 2025, 04:58 PM IST
कपिल शर्मा पुन्हा अफेअरमध्ये अडकणार? 9 वर्षांनंतर 'या' चित्रपटाच्या सिक्वेलचे शूटिंग सुरू title=

'kis kisko pyaar karoon': कपिल शर्माचा किस किसको प्यार करूं या चित्रपटाचा सिक्वेल लवरकचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचा पसंतीत पडलेला. या चित्रपटात कपिल शर्माच्या झालेल्या गडबडीमुळे प्रेक्षकांध्ये खूपचं हशा पिकलेला. तब्बल 9 वर्षांनी कपिल पुन्हा आपल्या या चित्रपटाचा सिक्वेल घेऊन येत. चित्रपटाचे दिग्दर्शन अनुकल्प गोस्वामी करत आहेत तर या चित्रपटाची निर्मिती रतन जैन, गणेश जैन, आणि अब्बास-मस्तान यांच्या टीमद्वारे केली जात आहे. पहिल्या भागात कपिलसोबत सई लोकूर, जेमी लीव्हर, अरबाज खान, मंजरी फडणीस, सिमरन कौर मुंडी, एली अवराम, वरुण शर्मा, सुप्रिया पाठक, शरत सक्सेना आणि मनोज जोशी हे कलाकार होते. या पुढील भागात कपिल शर्मासोबत मनजोत सिंग असणार आहे. अब्बास-मस्तान यांच्या दिग्दर्शनाखाली कपिल आणि त्यांची जोडी एकत्र काम करणार आहे. 'किस किसको प्यार करूं' च्या यशस्वी अनुभवावर आधारित या सिक्वेलमध्ये गोंधळ, प्रेम आणि हास्याचा अद्भुत मिलाफ दिसेल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'किस किसको प्यार करूं'मध्ये कपिलने कुमार शिव राम किशन नावाच्या पात्राची भूमिका साकारली होती. त्याच्या या पात्रात तो तीन बायकांमध्ये अडकलेला आणि गोंधळात असलेला एक मजेशीर पुरुष होता. त्याच्या गोंधळलेल्या प्रेमाच्या कथा प्रेक्षकांना खूप आवडल्या होत्या आणि त्याच्या कॉमिक टाइमिंगने चित्रपटाला यश दिलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आणि कपिल शर्मा च्या फिल्मी करिअरला एक मोठा ठसा उमठवला.

 हे ही वाचा: प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभक्तीवर आधारित 10 अजरामर चित्रपट

'किस किसको प्यार करूं 2' मध्ये कपिल पुन्हा एकदा प्रेमाच्या गोंधळात अडकलेला दिसणार आहे. सिक्वेलमध्ये कपिलच्या अभिनयाला अधिक गडद आणि मजेशीर रंग चढवले जाणार आहेत. प्रेक्षकांना त्याच्या गोंधळलेल्या प्रेमकथेची, हास्य आणि अडचणींची प्रतीक्षा आहे. या चित्रपटावर प्रेक्षकांची खूप मोठी उत्सुकता आहे आणि त्याचं यश काय ठरेल हे पाहणे आणखी रोमांचक ठरेल.