Karan Veer Mehra on Scene with Sunny Leone : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता करण वीर मेहरा सध्या चर्चेत आहे. वीर मेहरानं सोशल मीडिया इन्फूएन्सल एल्विश यादवच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यानं त्याच्या खासगी आयुष्यासोबत त्याच्या कामाविषयी देखील मोकळेपणानं वक्तव्य केलं आहे. इतकंच नाही तर सनी लियोनीसोबत 'रागिनी एमएमएस 2' मध्ये काम करण्याचा एक्सपीरियंस देखील सगळ्यांसोबत शेअर केला आहे.
पॉडकास्ट दरम्यान, एल्विशनं करणला त्याचा हॉरर चित्रपट 'रागिनी एमएमएस 2' आणि सनी लियोनीसोबत त्याचा बाथरुमचा सीन होता. त्याविषयी एल्विशनं करणला असं विचारलं. त्यावर उत्तर देत एल्विश म्हणाला, एक शॉवर सीन होता. करण मस्करीत पुढे म्हणाला, 'मी म्हणालो की जेव्हा त्यानं हा सीन त्याच्या मित्रांना दाखवला. तेव्हा त्याचे मित्र डिप्रेशनमध्ये गेले. इतकंच नाही तर चार मित्र अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाही.'
एल्विशनं मस्करीत पुढे सांगितलं की 'त्यानं तो सीन कमीत कमी 10 वेळा पाहिला असेल. त्यानंतर याचा संदर्भ लावत त्यानं करणला विचारलं की त्यानं या सीनमध्ये विचारलं की त्यानं या सीनसाठी उपवास ठेवले होते का? करणनं हसत उत्तर दिलं की त्या दिवशी तर मी जेवलो होतो. कारण मला त्या सीनसाठी जास्त एनर्जी हवी होती. तर हा सीन करताना खूप मज्जा आली. जेव्हा मित्रांना तो सीन दाखवला तर त्यांनी मस्करी केली की तू या कामासाठी पैसे पण घेतले? करणनं हे देखील सांगितलं की त्या सीनसाठी अनेक रीटेक झाले होते.'
हेही वाचा : 'या' अभिनेत्रीला भोजपुरी चित्रपटासाठी मिळाला नॅशनल अवॉर्ड; घटस्फोटानंतर सिंगल लाइफचा घेते आनंद
याविषयी सांगत करण पुढे म्हणाला, 'सकाळी 11 वाजता शूटिंग सुरु झाली होती आणि रात्री 9 वाजेपर्यंत शूटिंग सुरु होती. सांगायचं म्हटलं तर हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सीक्वलचं दिग्दर्शन हे भूषण पटेल यांनी केली आहे. चित्रपटात सनी लियोनी आणि करण वीर मेहराशिवाय साहिल प्रेम, परवीन डब्बास, संध्या मृदुल, दिव्या दत्त आणि अनीता हसनंदानी सारखे कलाकार दिसले होते. तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता. दरम्यान, 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रागिनी एमएमएस' चा सीक्वल होता. त्यात राजकुमार राव आणि कैनाज मोतीवाला हे कलाकार दिसले होते.'