Why is FIITJEE shutting down: FIITJEE हे IIT-JEE क्षेत्रातील मोठे नाव. इंजिनीयरींगची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थींनी FIITJEE कोचिंग क्लासेसमध्ये प्रेवश घेतला. विद्यार्थ्यांनी लाखो रुपये फी भरली. मात्र, रातोरात FIITJEE कोचिंग क्लासेस बंद पडले आणि विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला. नेमकं काय घडलं जाणून घेऊया.
दिल्ली-एनसीआरसह देशातील पाच शहरांमध्ये FIITJEE केंद्रे बंद झाली आहेत. यामुळे हजारो विद्यार्थांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. कोचिंग सेंटर्स रातोरात बंद झाल्याने विद्यार्थी आणि पालकांना मोठा धक्का बसला आहे. भरमसाठ फी भरून कोचिंग सेंटर्स अचानक बंद केल्याने मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. कोटिंग सेंटरच्या बाहेर विद्यार्थी आणि पालकांची गर्दी पहायला मिळत आहे. लाखो रुपये फी भरुन जिथे विद्यार्थी कोचिंगसाठी जात होते त्या FIITJEE केंद्रांना कुलूप लागले आहे. फीचे लाखो रुपये अडकले आहेत.
एका अहवालानुसार 2023 मध्ये FIITJEE चा टर्नओव्हर 542 कोटी रुपये इतका होता. FIITJEE ची सुरुवात 1992 मध्ये दिल्लीतील एका छोट्या केंद्रातून झाली. काही वर्षांतच देशभरात या कोचिंग सेंटरच्या शाखा पसरल्या. अनेक IIT टॉपर्स आणि FIITJEE मधील निवडींनी FIITJEE च्या यशात भर घातली आहे. FIITJEE लोकप्रियता इतकी वाढली की दिल्लीसह देशभरात यांची 72 केंद्रे उघडण्यात आली. FIITJEE चा मालक कोण आहे?
आयआयटी दिल्लीतून मेकॅनिकल इंजिनीअरिंग केलेल्या डीके गोयल यांनी FIITJEE सुरू केले. आयआयटी-जेईईच्या प्रवेश निवडीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने त्यांनी हे कोचिंग सेंटर सुरू केले होते. सर्वप्रथम दिल्लीत छोटेसे केंद्र उघडण्यात आले. FIITJEE कोचिंग सेंटरमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा आयआयटीमध्ये निवड होऊ लागली. अनेकांनी टॉप देखील केले. यामुळे FIITJEE कोचिंग क्लासेसची लोकप्रियता वाढू लागली. हळूहळू IIT बरोबरच त्यांनी NEET (वैद्यकीय प्रवेश परीक्षा) ची तयारीही सुरू केली. कोचिंग सेंटर व्यतिरिक्त, त्यांच्याकडे ग्लोबल स्कूल, FIITJEE वर्ल्ड स्कूलसह अनेक सहयोगी शाळा आहेत.