रक्तबंबाळ... सैफच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या, रिक्षाचालक भजनलालने सांगितला 'तो' क्षण

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा ऑटो चालक भजन सिंग राणा त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात घेऊन गेला. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 18, 2025, 11:13 AM IST
रक्तबंबाळ... सैफच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या, रिक्षाचालक भजनलालने सांगितला 'तो' क्षण  title=

अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी मध्यरात्री 15 जानेवारी रोजी दरोडेखोराने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ अली खानवर चाकूचे 6 वार करण्यात आले. रक्तबंबाळ अवस्थेत अभिनेत्याला रुग्णालयात नेण्यात आले. ही घटना घडली तेव्हा सैफचा ड्रायव्हर तिथे नव्हता. सैफला एका ऑटोने रुग्णालयात नेण्यात आले, अभिनेत्याला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या ऑटो चालकाने तेव्हा घडलेला प्रसंग सांगितला आहे. हे. ऑटो चालक भजन सिंग राणा म्हणतात की, ऑटोमधील व्यक्ती सैफ अली खान आहे हे त्यांच्या लक्षात आले नाही. त्याचा कुर्ता पूर्णपणे रक्ताने माखला होता.

ऑटो चालकाने सांगितले की, त्याने रक्ताने माखलेला पांढरा शर्ट घातला होता. त्याच्यासोबत एक मुलगा बसला होता आणि एक तरुणही बसला होता. ऑटो चालकाने सांगितले की, जखमी प्रवाशाने सांगितले की मी सैफ अली खान आहे. ऑटो रिक्षा चालकाने सांगितलं त्यानुसार सैफसोबत तैमूर आणि इब्राइम होते. 

रुग्णालयात पोहोचताच सैफने.... 

वृत्तसंस्था पीटीआयनुसार, ऑटो रिक्षाचालक भजन सिंग राणा म्हणाले की, त्यांना माहित नव्हते की रक्ताने माखलेला कुर्ता घातलेला प्रवासी, ज्याला तो लीलावती रुग्णालयात घेऊन गेला होता, तो बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आहे. "आम्ही रुग्णालयाच्या गेटवर पोहोचलो तेव्हा त्याने गार्डला स्ट्रेचर आणण्यासाठी बोलावले आणि तो सैफ अली खान असल्याचे सांगितले," असे ऑटो चालकाने शुक्रवारी मुंबईत पत्रकारांना सांगितले. त्यांनी सांगितले की, जेव्हा रिक्षाचालक अभिनेत्याचे निवासस्थान असलेल्या सतगुरु दर्शन भवनाजवळून जात होते, तेव्हा एका महिलेने आणि इतर काही जणांनी त्यांना ऑटो थांबवण्यास सांगितले. मग एक माणूस ऑटोमध्ये बसला ज्याचा पांढरा कुर्ता रक्ताने माखला होता. त्याच्या मानेवर आणि पाठीवर जखमा असल्याचे मला दिसले, पण हाताच्या दुखापतीकडे लक्ष दिले नाही, असं रिक्षाचालकाने सांगितले. 
तैमूरही सैफसोबत हॉस्पिटलमध्ये गेला होता का?

सैफचा मुलगा तैमूरही त्याच्यासोबत रुग्णालयात गेला होता का? असे विचारल्यावर चालकाने सांगितले की, ऑटोमध्ये सुमारे सात ते आठ वर्षांचा एक मुलगाही होता. ड्रायव्हरने सांगितले की सुरुवातीला अभिनेत्याला वांद्रे येथील होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये नेले जाणार होते, परंतु नंतर सैफने स्वतः लीलावतीला जाण्यास सांगितले. 

सात-आठ मिनिटांत रुग्णालयात पोहोचलो

ऑटो ड्रायव्हर पुढे म्हणाला, रुग्णालयात पोहोचताच सैफ अली खानने गार्डला स्ट्रेचर आणण्यास सांगितले. तो म्हणाला, 'कृपया एक स्ट्रेचर आणा.' मी सैफ अली खान आहे. ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार, ऑटो पहाटे तीनच्या सुमारास रुग्णालयात पोहोचला. ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार, तो अभिनेत्याला सुमारे सात ते आठ मिनिटांत रुग्णालयात घेऊन गेला आणि त्याला सोडल्यानंतर भाडेही घेतले नाही.