Bollywood Superstar: वरील फोटोमध्ये आपल्या आईसोबत दिसणारा मुलगा कोण आहे? हे ओळखणं अनेकांना कठीण जात असेल. खरंतर, हा मुलगा एक बॉलिवूड सुपरस्टार आहे. या अभिनेत्याने एकाहून एक हीट चित्रपट दिले आहेत. त्याचे स्टारडम शाहरुख आणि सलमान पेक्षा कमी नाही. यांनी त्यांच्या काळातील हीट चित्रपटांमध्ये अनेक लोकप्रिय अभिनेत्रींसोबत काम केले आहे. आपल्या अभिनयाने बॉलिवूड चित्रपटसृष्टीत एक दमदार अभिनेता म्हणून त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.
या फोटोमधील व्यक्ती ही दुसरी तिसरी कोणी नसून, बॉलिवूडचे सुपरस्टार जग्गू दादा म्हणजेच अभिनेता जॅकी श्रॉफ आहेत. जॅकी श्रॉफ या फोटोमध्ये आपल्या आईसोबत दिसत आहेत. जय किशन श्रॉफ हे त्यांचे पूर्ण नाव आहे.
जॅकी श्रॉफ हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांचे खरे नाव जयकिशन काकूभाई श्रॉफ असे आहे. त्यांनी जवळपास 9 भाषांतील चित्रपटांमध्ये काम केले आहे.सुभाष घई यांनी 'हीरो' या चित्रपटात जॅकी श्रॉफना कास्ट केले होते. त्यांनी अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्रि यांच्यासोबत या चित्रपटात काम केले. या चित्रपटामुळे त्यांना जॅकी असे नाव पडले. त्यांचा हा चित्रपट हीट ठरला आणि जॅकी श्रॉफच्या या पहिल्या चित्रपटामुळे ते स्टार झाले. त्यांनी त्यांच्या आजवरच्या चित्रपटात वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटात पदार्पण करण्याआधी जॅकी श्रॉफ हे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होते आणि हे खूप कमी लोक जाणत असतील.
स्वत:च्या मेहनतीने बॉलिवूड सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण करणाऱ्यांमध्ये जॅकी श्रॉफ यांचं नाव घेतलं जातं. बालपणी त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना त्यांचं शिक्षण मध्येच सोडावं लागलं होतं. अभिनेता म्हणून काम करण्याआधी ते मुंबईतील एका चाळीत राहत होते. सुशाष घई यांच्या 'हीरो' या चित्रपटात काम करुन ते एका रात्रीत स्टार बनले. मात्र, यानंतर सुद्धा कित्येक दिवस ते त्या चाळीत राहिले. जॅकी श्रॉफ यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, निर्माते त्यांना चित्रपट साइन करण्यासाठी त्यांच्या टॉयलेटबाहेर रांग लावायचे.
जॅकी श्रॉफ E-टाइम्सशी बोलताना म्हणाले, "हो, मी राहत असलेल्या चाळीत निर्माते यायचे आणि मला स्क्रिप्ट ऐकवून दाखवायचे. माझ्या घरात असलेल्या ड्रमवर ते बसायचे, ज्याचा मी खुर्ची म्हणून वापर करत होतो. जेव्हा मी टॉयलेटला किंवा आंघोळीला जायचो तर निर्माते तिथे बसून माझी वाट पाहत बसायचे आणि चित्रपट साइन करून घ्यायचे. माझा पहिला 'हिरो' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 4 ते 5 वर्षांनंतरही मी त्या चाळीत राहिलो कारण मला तिथे राहायला खूप आवडायचे."