कोल्डप्लेच्या भारत दौऱ्याच्या आधी ख्रिस मार्टिन आणि डकोटा जॉन्सन यांनी घेतले महादेवाचे आशीर्वाद; व्हिडीओ झाला व्हायरल

ब्रिटीश रॉक बँड कोल्डप्ले सध्या त्यांच्या 'म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूर'मधून जगभर भ्रमंती करत आहे. यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये अतिशय उत्साह निर्माण झाला आहे. बँडचे प्रमुख सदस्य ख्रिस मार्टिन आणि हॉलिवूड अभिनेत्री डकोटा जॉन्सन भारतात पोहोचल्यावर मुंबईतील श्री बाबुलनाथ मंदिरात महादेवाचे आशीर्वाद घेतल्याचे समोर आले आहे.

Intern | Updated: Jan 18, 2025, 12:03 PM IST
कोल्डप्लेच्या भारत दौऱ्याच्या आधी ख्रिस मार्टिन आणि डकोटा जॉन्सन यांनी घेतले महादेवाचे आशीर्वाद; व्हिडीओ झाला व्हायरल  title=

Chris Martin Visits Lord Shiva Temple:ख्रिस मार्टिन आणि डकोटा जॉन्सन हे दोघेही भारतीय संस्कृतीत रुचि ठेवणारे असल्याचे दिसून आले आहे. मुंबई विमानतळावर पोहोचल्यावर ख्रिसने हात जोडून भारतीय चाहत्यांना नमस्कार केला. त्यानंतर, शुक्रवारच्या दिवशी हे जोडपे प्रसिद्ध श्री बाबुलनाथ मंदिरात महादेवाचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले. ख्रिस निळ्या रंगाच्या कुर्त्यात आणि रुद्राक्ष जपमाळ घालून मंदिरात दिसला, तर डकोटा ने भारतातले पारंपरिक सूट आणि स्कार्फ परिधान केला होता. ज्यामुळे ते दोघे भारतीय रंगात रंगले होते. 

मंदिरात गेल्यावर ख्रिस आणि डकोटा यांनी हात जोडून महादेवाचे दर्शन घेतले. यानंतर डकोटाने पारंपरिक भारतीय पद्धतीने नंदी महाराजांच्या कानात आपल्या इच्छा व्यक्त केल्या. या सुंदर आणि पवित्र क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि अनेक चाहत्यांनी त्यांचे कौतुक केले. भारतीय संस्कृतीबद्दल असलेल्या त्यांच्या आदरामुळे भारतीय फॅन्समध्ये खूप सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

कोल्डप्लेच्या भारत दौऱ्याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. बँडचे 2016 मध्ये भारतात एक कॉन्सर्ट झाले होते आणि आता ते 9 वर्षांनंतर पुन्हा भारतात परफॉर्म करत आहेत. 'म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूर'च्या अंतर्गत, कोल्डप्ले 18, 19 आणि 21 जानेवारी रोजी नवी मुंबईतील 'डीवाय पाटील स्टेडियम'वर परफॉर्म करतील, ज्यासाठी भारतीय प्रेक्षकांची मोठी तयारी सुरू आहे. यानंतर बँड 25 जानेवारीला अहमदाबादच्या 'नरेंद्र मोदी स्टेडियम'मध्ये परफॉर्म करणार आहे.

कोल्डप्लेच्या या बहुप्रतिक्षित दौऱ्याचे भारतीय चाहते मोठ्या उत्साहाने स्वागत करत आहेत. कोल्डप्लेचे संगीत आणि त्यांची स्टाईल, दोन्ही भारतीय श्रोत्यांसाठी आकर्षक ठरली आहे. चाहत्यांना त्यांच्या कन्सर्टची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि ख्रिस मार्टिन आणि डकोटा जॉन्सन यांच्या मंदिर भेटीने त्यांचा भारत दौरा अधिकच खास बनला आहे.