Top Work From Home Job Options of 2025: 2020 पासून कोरोनाच्या संसर्गामुळं वर्क फ्रॉम होम अर्थात घरातून काम करण्याची मुभा अनेक संस्थांनी कर्मचाऱ्यांना दिली. या पर्यायातून कर्मचाऱ्यांना हव्या त्या सुविधेसह कंपनीला अपेक्षित असणारं कामही मिळू लागलं. कर्मचाऱ्यांनी या पद्धतीनं कामाच्या Performance मध्ये बऱ्याचदा अपेक्षेपलीकडे जाऊनही काम केलं. वर्षभरामध्ये घरातून काम करण्याच्या या पद्धतीमध्ये मोठी वाढ झाली असून, आता अनेकांनीह या पर्यायाला प्राधान्य देत नोकरीच्या क्षेत्रामध्ये प्रगतीसाठी हा एक निकषच निर्धारित केला आहे.
नोकरी शोधतानाच हल्ली अनेक मंडळी WFH ला प्राधान्य देताना दिसतात. किंबहुना कैक कंपन्या याची पूर्तताही करतात. 2025 या वर्षात घरातून काम करण्यासाठी नेमक्या कोणत्या क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी आहेत हे जाणूनच घ्या...
मागील दोन वर्षांपासून डिजीटल मार्केटिंगच्या क्षेत्राला लोकप्रियता मिळाली आहे. सोशल मीडिया मॅनेजमेंट, एसईओ, ईमेल मार्केटिंग अशी कामं इथं अपेक्षित असतात. या क्षेत्रात महिन्याला 30000 रुपये इतका पगार मिळतो. अनुभवासोबत पगाराचा आकडा वाढत जातो.
हल्ली ऑनलाईन शिक्षणाची मागणी सातत्यानं वाढत असून, तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये कौशल्य असल्यास तुम्ही ऑनलाईन ट्यूटर म्हणून काम करु शकता. यासाठी ताशी 500 ते 2000 रुपये इतकी रक्कम / मानधन मिळतं.
तंत्रज्ञान क्षेत्रातील पुरेसं ज्ञान असल्याल वेब डेव्हलपर म्हणून नोकरीचा एक उत्तम पर्याय उपलब्ध असतो. जगभरात अनेक स्टार्टअप कंपन्या आहेत ज्यांच्याकडून वरील जागांसाठी नोकरभरती सुरू असते. यामध्ये महिन्याला 1 लाख रुपयांपर्यंतचा पगारही मिळतो.
तुमच्यामध्ये कलात्मक नजर आहे आणि डिझायनिंग टुल्सचा वापर तुम्ही योग्य पद्धतीनं करत असाल तर हे क्षेत्र तुमच्यासाठी योग्य आहे. यामध्ये महिन्याला 40000 रुपये मिळतात.
तुमच्याकडे लिखाणाची कला असेल तर, कंटेंट रायटिंग किंवा कॉपी रायटिंगचा पर्याय तुम्ही निवडू शकता. कैक कंपन्या जाणकार लेखकांच्या शोधात असतात. अनुभवी कंटेंट रायटर्सना महिना 50 हजार रुपये किंवा त्याहून अधिक मानधन मिळतं.