नाक, जीभ कापली; हाडं तोडली नंतर इलेक्ट्रिक शॉक देऊन...; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आला अभिनेता दर्शनचा क्रूर चेहरा

रेणुकास्वामी याची हत्या (Renuka Swami Murder Case) करण्याआधी त्याला इलेक्ट्रिक शॉक देऊन टॉर्चर करण्यात आलं होतं अशी माहिती सोमवारी पोलिसांनी दिली. पोलिसांनी नुकतंच याप्रकरणी धनराज नावाच्या व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत जो केबल कर्मचारी आहे. पोलिसांनी अपहरहण करण्यासाठी वापरण्यात आलेली एक कारही जप्त केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 17, 2024, 04:35 PM IST
नाक, जीभ कापली; हाडं तोडली नंतर इलेक्ट्रिक शॉक देऊन...; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आला अभिनेता दर्शनचा क्रूर चेहरा title=

कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता दर्शनला गेल्या आठवड्यात पोलिसांनी हत्या प्रकरणी अटक केली आहे. दर्शन याच्यावर चाहता रेणुकास्वामी याची हत्या केल्याचा आरोप आहे. रेणुकास्वामी हत्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलिसांनी सांगितलं आहे की, पीडितने अभिनेत्याची जवळची मैत्रीण, अभिनेत्री पवित्रा गौडाला आक्षेपार्ह मेसेज पाठवले होते. यामुळेच नाराज झालेल्या दर्शनने रेणुकास्वामीच्या हत्येची सुपारी दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शन सतत आरोपींच्या संपर्कात होता. रेणुकास्वामीचं अपहरण केल्यानंतर त्याला दर्शनकडे आणण्यात आलं होतं. पोलिसांनी याप्रकरणी दर्शन आणि पवित्रा यांच्यासह 17 जणांना अटक केली आहे. त्यात आता रेणुकास्वामीच्या शवविच्छेदनातून धक्कादायक खुलासे झाले आहेत. 

इलेक्ट्रिक शॉक देऊन छळ

सोमवारी पोलिसांनी सांगितलं की, रेणुकास्वामीची हत्या करण्याआधी त्याला इलेक्ट्रिक शॉक देऊन टॉर्चर करण्यात आलं होतं. पोलिसांनी नुकतंच याप्रकरणी धनराज नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे, धनराज केबल कर्मचारी आहे. धनराजने पोलिसांना सांगितलं आहे की, प्रकरणातील आणखी एक आरोप नंदीशने त्याला बंगळुरुमधील गोडाऊनमध्ये बोलावलं होतं. तिथे रेणुकास्वामीला शॉक देण्यासाठी एका डिव्हाइसचा वापर करण्यात आला. पोलिसांनी हे डिव्हाइसही जप्त केलं आहे. 

कारही जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सकाळी 9.30 वाजता रेणुकास्वामीचा रिक्षातून पाठलाग करण्यास सुरुवात केली. त्याचा एक सहकारी स्कूटरवरुन त्यांना फॉलो करताना दिसत आहे. पोलिसांनी रेणुकास्वामीच्या अपहरणासाठी वापरण्यात आलेली एक कारही जप्त केली आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, ही कार चित्रदूर्ग जिल्ह्यात अय्यनहल्ली गावात एका घराबाहेर बाहेर उभी होती. आरोपींपैकी एक रवीने ही कार तिथे सोडली होती. रवीच्या कुटुंबाकडे चौकशी केल्यानंतर या कारमधून अनेक गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत. 

शवविच्छेदनातून धक्कादायक खुलासे

याआधी जी माहिती समोर आली होती त्यात सांगण्यात आलं होतं की, रेणुकास्वामीचा पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांना त्याच्या शरिरावर गरम लोखंडी रॉडने चटके दिल्याचे निशाण दिसले होते. डॉक्टरांनी सांगितलं की, त्याचं नाक, जीभ कापण्यात आली होती. तसंच जभडाही तोडण्यात आला होता. त्याच्या शऱिरातील जवळपास सर्वच हाडं मोडली होती. त्याच्या खोपडीला फ्रॅक्चर होतं. 

दर्शनला कन्नड चित्रपटसृष्टीत 'चॅलेंजिंग स्टार' म्हणून ओळखलं जातं. पोलिसांनी मंगळवारी दर्शनसह अन्य 12 लोकांना अटक केली होती. शनिवारी त्यांच्या कोठडीत वाढ कऱण्यात आली. याप्रकरणी अद्याप तपास सुरु आहे.