पुढील दोन महिने प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची पर्वणी, तब्बल 'इतके' सिनेमे भेटीला

सध्या ओटीटीवर वेबसीरिजने धूमाकुळ घातला आहे. पंचायत आणि लापता लेडीज सारख्या वेबसिरीजने ओटीटीवर सर्वांच लक्ष वेधून घेतलं. सध्याचा प्रेक्षकवर्ग हा मोठ्या प्रमाणात ओटीटी प्लॅटफॉर्मला पसंती दर्शवतो. अशातच आता बॉलिवूडचे अनेक सिनेमे रिलीज होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे जून आणि जुलै महिना प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे.   

Updated: Jun 17, 2024, 02:14 PM IST
पुढील दोन महिने प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची पर्वणी, तब्बल 'इतके' सिनेमे भेटीला title=

अभिनेता अजय देवगण ते दीपिका आणि प्रभास सारख्या बॉलिवूडच्या बड्या कलाकारांचे आगामी सिनेमे लवरकच चाहत्यांच्या भेटीस येत आहेत. 

कल्की 2898 AD 
दीपिका आणि प्रभास यांच्या बहुप्रतिक्षित 'कल्की 2898 AD' सिनेमाचा सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. सिनेमाच्या ट्रेलरलाला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळाला. व्हिएफक्स,खिळवून ठेवणारं कथानक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दीपिका आणि प्रभास यांची केमिस्ट्री. रिलीजनंतर हा सिनेमा सुपरहीट ठरणार असा विश्वास सिनेमाच्या निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. बॉलिवूडच्या टॉप आगामी सिनेमांपैकी एक म्हणजे कल्की 2898 AD. ट्रेलर प्रमाणेच सिनेमाला देखील प्रेक्षकवर्ग तितकाच प्रतिसाद देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

 

कोटा फॅक्टरी सिजन 3 
पंचायतमधील सचिवजीच्या भूमिकेमुळे चर्चेत आलेला अभिनेता जितेंद्र कुमारची 'कोटा फॅक्टरी सिजन' 3 चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरची सुरुवात ही जीतू भैय्याच्या तैयारी जीत की या पॉडकास्ट शोने होते. ही सिरीज 20 जूनला नेटफिक्सवर येणार आहे. कोटा फॅक्टरीतील जीतू भैय्याच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. कोटा फॅक्टरीच्या तिसऱ्या सिझनमध्ये बरेच नवीन ट्वीस्ट येणार असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे आता कथेत काय नवं वळण येणार याबाबत सिरीजच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. 

 

'जट्ट एंड जूलिएट'
दिलजीत दोझांस आणि नीरु बाजवा यांची मुख्य भूमिका असलेला  'जट्ट एंड जूलिएट' चा तिसरा भाग लवकरच मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. थोडा रोमान्स आणि थोडी कॉमेडी असा हा सिनेमा 28 जूनला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 

 

 

मिर्जापुर 3
'मिर्जापुर' सिरीज म्हटलं की पंकज त्रिपाठी हे नाव आठवतंच. अ‍ॅक्शन, ड्रामा आणि ट्वीस्ट अशा या सिरीजचा एक वेगळाच चाहता वर्ग तयार झाला आहे. या सिरीजचा टीझर नुकताच रीलीज झाल्या असून ट्रेलरकडे अनेकांच्या नजरा वळल्या आहेत.ट्रेलरची सुरुवात जंगलातील प्राण्यांच्या शिकारीने होते. जसं जंगली प्राणी एकमेकांचा जीव घेतात तशीच माणसं देखील स्वार्थासाठी जनावरांसारखी वागतात. ही सिरीज 5 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 

 

इश्क विश्क रिबाउंड

बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेला 'इश्क विश्क रिबाउंड' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. रोहित सराफ, साथ जिब्रान खान, पशमीना रोशन आणि नैला ग्रेवाल हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. तीन मित्रांच्या आयुष्याची गोष्ट सांणारा सिनेमा 21 जूनला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. 

 

औरों में कहां दम था 

बॉलिवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगणचा नवा सिनेमा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. 'औरों में कहां दम था' या सिनेमातून पुन्हा एकदा अजय आणि तब्बूची जोडी मोठ्या पडद्यावर पहायाला मिळणार आहे. बरेच अजयचा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. मात्र आता 'औरों में कहां दम था' चा ट्रेलर रिलीज झाला असून 5 जुलैला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 
 
'राउतू का राज' 

अ‍ॅक्शन सिनेमा आणि नवाजुद्दीन सिद्दीकी हे समीकरण हमखास पाहायला मिळतं. अशातच आता एका मर्डर मिस्ट्रीमध्ये सिनेमात दिसणार आहे. 'राउतू का राज' हा त्याचा आगामी सिनेमा 28 जून को झी 5 वर रिलीज होणार असून नुकताच त्याचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे.