मॉडेलने सिद्धार्थची कॉलर ओढली, जवळ खेचून अंगझटी करण्याचा प्रयत्न; नंतर पोस्ट शेअर करत म्हणाली 'कियारा तू...'

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने (Sidharth Malhotra) नुकतंच एका फॅशन शोमध्ये सहभागी झाला होता. यावेळी मॉडेल रॅम्पवर सिद्धार्थशी फ्लर्ट करत होती. मात्र सिद्धार्थ यामध्ये फारसा रस घेत नव्हता.   

शिवराज यादव | Updated: Aug 18, 2024, 07:11 PM IST
मॉडेलने सिद्धार्थची कॉलर ओढली, जवळ खेचून अंगझटी करण्याचा प्रयत्न; नंतर पोस्ट शेअर करत म्हणाली 'कियारा तू...' title=

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने (Sidharth Malhotra) अलीकडेच एका फॅशन शोमध्ये हजेरी लावत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दिल्लीत हा फॅशन शो पार पडला. शंतनू आणि निखिल यांच्यासाठी सिद्धार्थ मल्होत्राने रॅम्प वॉक केला. दरम्यान यावेळी एक मॉडेल सिद्धार्थशी फारच अंगझटीला येत होती. ती सिद्धार्थसह आक्षेपार्ह पोझ देत होती. पण दुसरीकडे सिद्धार्थ मात्र यामध्ये अजिबात रस दाखवत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरुन ते स्पष्ट दिसत होतं. दरम्यान या मॉडेलने आता इंस्टाग्राम स्टोरीमधून सिद्धार्थची पत्नी कियाराची माफी मागितली आहे. 

ॲलिसिया कौरने मागितली होती माफी

ॲलिसिया कौर या मॉडेलने फॅशन शोनंतर तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर रॅम्प वॉकवरील फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. एका फोटोत तिने सिद्धार्थला मिठी मारली आहे आणि #sorrykiara असं लिहिलं आहे. तिने एक मिमही शेअर केलं आहे, ज्यामध्ये ‘सिद्धार्थ मल्होत्रासोबत 365 डेजच्या रिमेकसाठी याचिका’ सुचवली होती. हे आमचं काम आहे असं तिने सोबत लिहिलं आहे. 

सिद्धार्थ आणि ॲलिसिया फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करत असल्याचे व्हिडीओ सोशळ मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये ती डान्सचा भाग म्हणून त्याची कॉलर ओढताना दिसत आहे. रॅम्पवर पोझ देताना सिद्धार्थने तिला जवळ घेतलं होतं.

सिद्धार्थने काळ्या रंगाचा टक्सिडो परिधान केला होता. या सर्वांवर कियारा काय म्हणेल असं म्हणत अनेकांनी त्यावर कमेंट्सही केल्या. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @bollywoodarab.fc2

सिद्धार्थची आई आणि भाऊदेखील शोमध्ये उपस्थित होते. रेट्रो आउटफिट्समधील मॉडेल्स यावेली रॅम्प वॉक करत होत्या. या शोची सुरुवात अभिनेता झीनत अमान यांच्या उपस्थितीने झाली. अभिनेता-गायिका सबा आझादने यावेळी परफॉर्मन्स देत उत्साह वाढवला. 

या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या योद्धामध्ये सिद्धार्थ अखेरचा दिसला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अपेक्षित कामगिरी करु शकला नव्हता. त्याने अद्याप आगामी चित्रपटांची घोषणा केलेली नाही. मात्र, त्याने आधीच मिट्टी नावाच्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केल्याची चर्चा आहे.