श्रीदेवी यांच्या निधनानंतर जान्हवीला मिळाली आणखीन एक 'मॉम'

 ही 'ऑनस्क्रीन' आई जान्हवीला आईची कमतरता जाणवणार नाही, याची काळजी घेत आहे. 

Updated: Apr 19, 2018, 08:39 PM IST
श्रीदेवी यांच्या निधनानंतर जान्हवीला मिळाली आणखीन एक 'मॉम' title=

मुंबई : जवळपास पाच दशकांपर्यंत आपल्या अभिनयानं सगळ्यांच्या मनावर मोहिनी घालून सगळ्यांची फेव्हरिट 'चांदनी' बनलेल्या श्रीदेवी यांचा अचानक झालेला मृत्यू त्यांच्या अनेक चाहत्यांना धक्का लावून गेला. याचा सर्वात मोठा धक्का बसला तो त्यांच्या मुलींना... मोठी मुलगी जान्हवीनं तर बॉलिवूड पदार्पणापूर्वीच आईला गमावल्यानं तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला... जान्हवीला आता श्रीदेवी यांना पुन्हा आयुष्यात आणणं अशक्य आहे... परंतु, जान्हवीला आईची कमतरता जाणवू नये, याची काळजी घेणारी आणखी एक 'मॉम' सध्या जान्हवीजवळ आहे. 

जान्हवी कपूर लवकरच करण जोहरचा सिनेमा 'धडक'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. हा सिनेमा सुपरहीट ठरलेल्या 'सैराट' या मराठी सिनेमाचा रिमेक आहे. अभिनेत्री शालिनी कपूर या सिनेमात जान्हवीच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहेत. ही 'ऑनस्क्रीन' आई जान्हवीला आईची कमतरता जाणवणार नाही, याची काळजी घेत आहे. जान्हवीसाठी शालिनी चिंतातूर आहेत... त्या आपल्या मुलीची पुरेपूर काळजी घेत आहेत.  

श्रीदेवी यांच्या निधनानंतर वडील बोनी कपूर यांच्यासमोरची सर्वात मोठी काळजी होती ती म्हणजे... त्यांच्या मुलींची काळजी कोण घेणार? आता कदाचित शालिनी यांच्या जान्हवीबद्दल असणाऱ्या भावनेमुळे त्यांची चिंता थोड्याफार प्रमाणात का होईना कमी होईल.