केसरीच्या सेटवर खिलाडी अक्षय कुमार जखमी

 हे सीन्स शूट करताना अक्षयच्या हाडांना दुखापत झाली. अक्षयची स्थिती पाहता डॉक्टरांनी त्याला मुंबईत परतून आराम करण्याचा सल्ला दिलाय. 

Updated: Apr 19, 2018, 08:01 PM IST
केसरीच्या सेटवर खिलाडी अक्षय कुमार जखमी  title=

मुंबई : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार आपल्या आगामी सिनेमा 'केसरी' च्या चित्रिकरणासाठी साताऱ्यात आहे. या ठिकाणी शुटींगदरम्यान त्याला दुखापत झाल्याचे समोर आलय. इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, केसरी सिनेमाच्या क्लायमेक्सचे शूट सुरू होते. यामध्ये अक्षय कुमारला मारामारीचे अॅक्शन्स सीन करायचे होते. हे सीन्स शूट करताना अक्षयच्या हाडांना दुखापत झाली. अक्षयची स्थिती पाहता डॉक्टरांनी त्याला मुंबईत परतून आराम करण्याचा सल्ला दिलाय. पण अक्षयला पुन्हा मुंबईत परतायचे नाहीए.त्यामुळे त्याने तिथेच थांबण्याचा निर्णय घेतलाय. तुर्तास या क्लायमॅक्स सीनची शूटींग रद्द करण्यात आली आहे. 
  
  'केसरी' सिनेमात अक्षय हा हवालदार इश्वर सिंह (मिलिट्री कमांडर) च्या भूमिकेत दिसणार आहे.

 

Innocent smiles galore on set today! Shooting with these lovely children playing Afghani kids in #Kesari based on the Battle Of Saragarhi, one of the bravest battles fought in India.

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on

हा सिनेमा १८९७ मध्ये झालेल्या सारागढच्या लढाईवर आधारित आहे. यामध्ये २१ शिखांनी १० हजार अफगाण्यांशी युद्ध केल होतं. शिखांच्या बहादुरीला हा सिनेमा सलाम करतो. अक्षयसोबत या सिनेमात परिणीती चोप्रा काम करत आहे. २२ मार्च २०१९ ला हा सिनेमा रिलीज होणार आहे.