11 वर्षांनंतर पुन्हा एकदा अंकुश ,स्वप्नील आणि सईची येणार एकत्र!

Ankush Chaudhari, Swapnil Joshi and Sai Tamhankar Will Share Screen :  अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर तब्बल 11 वर्षांनी शेअर करणार स्क्रीन

दिक्षा पाटील | Updated: Jun 6, 2024, 12:20 PM IST
11 वर्षांनंतर पुन्हा एकदा अंकुश ,स्वप्नील आणि सईची येणार एकत्र! title=
(Photo Credit : Social Media)

Ankush Chaudhari, Swapnil Joshi and Sai Tamhankar Will Share Screen : ए.वी.के पिक्चरस्, व्हिडीओ पॅलेस आणि मैटाडोर प्रोडक्शन प्रस्तुत एक नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नाव आणि अन्य बाबी जरी गुलदस्त्यात असल्या तरी अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी, संजय जाधव यांची टीम पाहूनच प्रेक्षकांच्या मनात टिक टिक वाजली असेल आणि धडधड पण नक्कीच वाढली असेल. अशीच काहीशी उत्सुकता आता वाढणार आहे. ही टीम आता पुन्हा नवीन चित्रपट घेऊन येत आहे.  

चित्रपटाची पूर्वतयारी आता सुरु झाली असून ही टीम प्रेक्षकांना 11 वर्षांनंतर भेटीस येणार आहे. या नव्या चित्रपटाचं दिग्दर्शक संजय जाधव आहे. तर या चित्रपटाचे निर्माते स्वाती खोपकर, अमेय खोपकर, नानूभाई जयसिंघानी आणि निनाद बत्तीन आहेत. 

या चित्रपटाबाबत अमेय खोपकर म्हणतात, "संजय जाधव यांचासारखा धमाकेदार दिग्दर्शक यांच्यासोबत येरे येरे पैसा, येरे येरे पैसा 3, कलावती हे यशस्वी  चित्रपट केल्यानंतर आता हा नवाकोरा चित्रपट करायला मिळतो आहे. अंकुश, सई, स्वप्नील यांसारखे कमाल कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या टीमसोबत माझे जुने ऋणानुबंध आहेत आणि ही टीम एकत्र आणण्याचा योग निनाद बत्तीन यांनी जुळवून आणला असून ही टीम पुन्हा एकत्र आल्यावर मोठा गेम तर नक्कीच होणार आणि चित्रपट गाजणारच!" 

हेही वाचा : काजोलसोबत हनीमूनवर असताना अजय देवगणला का आला होता ताप?

एकत्र येण्याबद्दल संजय जाधव म्हणतात, ''अकरा वर्षांपूर्वी 'दुनियादारी'च्या माध्यमातून सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी पडद्यावर एकत्र झळकले होते. प्रेक्षकांना त्यांची केमिस्ट्री प्रचंड भावली. मात्र त्यानंतर तिघे एकत्र पुन्हा दिसलेच नाही. हल्लीच मी एक शूट करत होतो. आधी या तिघांचे सिंगल शूट केले आणि नंतर तिघांचे एकत्र शूट केले. या दरम्यान मला या तिघांमधील भन्नाट केमिस्ट्री पुन्हा एकदा दिसली. तिघांना एका फ्रेममध्ये बघून मी जरा भावुक झालो. ‘दुनियादारी’नंतर यांचे बॅाण्डिंग प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळालेच नाही. तेव्हाच ठरवले यांना एकत्र घेऊन पुन्हा एकदा पडद्यावर या जादूची पुनरावृत्ती करावी. लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होईल. यात मला सहकार्य लाभले ते स्वाती खोपकर, अमेय खोपकर, नानूभाई जयसिंघानी आणि निनाद बत्तीन यांचे. यापूर्वीही आम्ही वेगवेगळया निमित्ताने सोबत काम केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ही टीम एकत्र येण्याचा योग जुळून आला आहे.''