अजय देवगण करतोय मराठीत पदार्पण

रितेश देशमुख, सलमान खान, प्रियंका चोप्रानंतर आता बॉलीवूडचा आणखी एक कलाकार मराठीत पदार्पण करतोय.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 24, 2017, 04:00 PM IST
अजय देवगण करतोय मराठीत पदार्पण title=

मुंबई : रितेश देशमुख, सलमान खान, प्रियंका चोप्रानंतर आता बॉलीवूडचा आणखी एक कलाकार मराठीत पदार्पण करतोय.

अजय देवगणचा पहिला मराठी सिनेमा

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण मराठीत नवा सिनेमा घेऊन येतोय. या सिनेमाचे नाव आहे मराठी मानूस. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्याने ही माहिती आपल्या चाहत्यांना दिलीये. येत्या ९ फेब्रुवारीला अजय देवगणचा 'मराठी मानूस' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

मराठीशी अनोखे नाते

बॉलीवूडमधील २५ वर्षात अजयने विविधांगी भूमिका साकारल्या. बॉलीवूडने अजयला बरंच काही दिलं. याप्रमाणेच महाराष्ट्राशी अजयचे वेगळे नाते आहे. काजोलशी लग्न झाल्यानंतर मराठी भाषेविषयी अजयची आपुलकी आणि प्रेम अधिक वाढले. मराठीशी असलेले हे नाते अधिक दृढ करण्यासाठी अजय देवगण हा सिनेमा घेऊन येतोय.