राजकुमार रावचा चित्रपटाचं स्क्रीनिंग राष्ट्रपती भवनात

चित्रपटाचे निर्माते विनोद बच्चन हे ऐकून प्रचंड खूष झाले.

Updated: Dec 24, 2017, 03:54 PM IST
राजकुमार रावचा चित्रपटाचं स्क्रीनिंग राष्ट्रपती भवनात title=

नवी दिल्ली : चित्रपटाचे निर्माते विनोद बच्चन हे ऐकून प्रचंड खूष झाले.

हे वर्ष राजकुमारचं

बॉलीवूड अभिनेता राजकुमार रावसाठी 2017 हे वर्ष फारच चांगलं होतं. या वर्षी त्याचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्याच्या अभिनयाचं कौतुकसुद्धा झालंय. त्याचा काही आठवड्यांआधीच प्रदर्शित झालेला चित्रपट 'शादी में जरूर आना' चक्क राष्ट्रपती भवनात दाखवला गेला. 

मंत्रालयसुद्धा याचा फॅन

या चित्रपटात राजकुमार राव आणि कृति खरबंदा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आम्हाला राष्ट्रपती भवनातून फोन आला होता.  मंत्रालय हा चित्रपट बघू इच्छितं कारण ह्या चित्रपटाबद्दल त्यांनी बरत कौतुक ऐकलं आहे, असं चित्रपटाचे निर्माते विनोद बच्चन यांनी सांगितलं. 

राष्ट्रपती भवनात स्क्रीनिंग

पुढे विनोद बच्चन म्हणतात, हे ऐकताच मी प्रचंड खूष झालो. आम्ही चित्रपटाचं राष्ट्रपती भवनात स्पेशल स्क्रीनिंग केलं. आता मंत्रालयातही हा चित्रपट दाखवला जाणार आहे. या चित्रपटाची कथा एका छोट्या शहरातील आहे. एका आयपीएस अधिकाऱ्याचा जीवन संघर्ष दाखवला आहे. छोट्या शहरातील कथा असल्यामुळे मोबाईलवर बघण्यापेक्षा प्रेक्षक हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन बघणं पसंत करतायेत, असं विनोद बच्चन म्हणाले.