लग्नाच्या 10 व्या wedding anniversary निमित्त सैफ-करिना घेणार मोठा निर्णय?

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

Updated: Oct 13, 2022, 08:41 PM IST
लग्नाच्या 10 व्या wedding anniversary निमित्त सैफ-करिना घेणार मोठा निर्णय?  title=

Kareena Kapoor Khan Wedding Anniversay: सध्या करीना कपूर आपल्या नव्या चित्रपटाच्या निमित्ताने लंडनमध्ये(Kareena Kapoor London Shoot) शूट करते आहे. करीनानं लंडनमध्ये दिग्दर्शक हंसल मेहतासोबत (Kareena Kapoor Hansal Mehta) तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे.  'मर्डर मिस्ट्री' (Murder Mistry) असं या चित्रपटाचं नावं आहे. या चित्रपटात करीना गुप्तहेराच्या भुमिकेतून दिसणार आहे. बालाजी मोशन पिक्चर्सतर्फे एकता कपूरनं (Ekta Kapoor) या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. परंतु आपल्या चित्रपटासोबतच करीना वेगळ्या कारणामुळं चर्चेत आली आहे. यावेळची दिवाळी करीना आणि सैफसाठी खास आहे कारण 16 ऑक्टोबर रोजी त्यांच्या लग्नाचा 10 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. (actress kareena kapoor and saif ali khan 10 wedding anniversary)

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी करीना कपूर खानची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल (Kareena Kapoor Social Media Post) होते तर कधी तिच्या बोलण्यावरून वाद होतात. दिवाळी काही दिवसांवर येणार आहे आणि चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सच्या दिवाळी प्लॅन्सबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. यावेळी करीना कपूर खान आणि सैफ अली खान  यांची दहावी वेडिंग अनिव्हर्सी (Kareena Kapoor and Saif Ali Khan Wedding) येते आहे. तेव्हा खास प्रसंगी सैफ आणि करिनाचा काय निर्णय आहे याबद्दल त्यांचे चाहते जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. 

हेही वाचा - करीना, कतरिनानंतर आता 'ही' मराठमोळी अभिनेत्री लपवत्येय Baby Bump? फोटो व्हायरल

समोर आलेल्या माहितीनुसार सैफ अली खान आणि करीना कपूर खान हे एकत्र साजरा करणार आहेत. हंसल मेहताच्या चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने करीना सध्या लंडनमध्ये असून लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ती मुंबईत परतणार आहे. करीना आणि सैफ दिवाळी एकत्र साजरी करतील नंतर करीना परत लंडनला रवाना होणार आहे. असेही कळते की सध्या करीना कपूर खान तिचा लहान मुलगा जेह अली करीनासोबत आहे, तर तैमूर वडील सैफसोबत मुंबईत आहे. (Kareena Kapoor Children)

हेही वाचा - 'मी सुंदर नाही पण...' बॉलीवूड पदार्पणावर जान्हवी कपूरचं मोठं वक्तव्य

आमिर खान आणि करीना कपूर खानचा लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chadha) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप ठरला होता. या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यात आला होता. आमिर खान आणि करिनाची अनेक विधाने सोशल मीडियावर व्हायरल झाली, त्यामुळे दोघांना ट्रोल करण्यात आले. करिनाशिवाय सैफबद्दल बोलायचे झाले तर सैफ सध्या विक्रम वेधमुळे (Vikram Vedha) चर्चेत आहे. चित्रपटाचे कलेक्शन चांगले आहे.